नाशिक – अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी महाराज यांचा इलाहाबाद मध्ये संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर आज नाशिकमधील प्रमुख आखाड्याच्या साधू महंतांनी नरेंद्र गिरी महाराज यांना श्रद्धांजली वाहून या सगळ्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. पेठरोडवरील भक्तीधाममध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली. महंत नरेंद्र गिरी महाराज यांनी आत्महत्या करून सुसाईड नोट लिहिल्याचं प्रथमदर्शनी समोर आले असले, तरी ही आत्महत्या असू शकत नाही, तर हत्या असण्याची शक्यता आहे, असा संशय साधू महंतांनी व्यक्त केला आहे.