बुधवार, ऑक्टोबर 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

२५०० किलो रंग, २००० किलो रांगोळी, २०० महिला, ३ तास… नाशकात साकारली तब्बल २५ हजार चौफुटांची भव्य महारांगोळी! (व्हिडिओ)

मार्च 20, 2023 | 4:45 pm
in इतर
0
FrqD8YwWIAQO uX

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक महानगर पालिका व नववर्ष स्वागत यात्रा समिती नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांच्या तिसऱ्या दिवशी फाल्गुन कृ. १४ अर्थात सोमवार (दि. २० मार्च) रोजी नाशिक येथील पाडवा पटांगण, (जुने भाजी मार्केट), नारोशंकर मंदिराजवळ, पंचवटी पाडवा पटांगण पर्यावरण रक्षण या अंतर्गत पंचमहाभुते या विषयाला अनुसरुन तब्बल २५ हजार स्क्वेअर फुटांची (२५० फूट बाय १०० फूट) ही भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे.

‘पर्यावरण रक्षण या अंतर्गत ‘पंचमहाभूते व त्याचे महत्व हे प्रत्येकाला आवर्जून समजावे या उद्देशाने व त्याचबरोबर सकारात्मक ऊर्जेने ‘मी’ चे ‘आम्ही’ मध्ये परावर्तन करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. रांगोळी साकारतांना पर्यावरणाचा समतोल हा पंचमहाभूतांवर अवलंबून आहे, आपले शरीर, पृथ्वी तसेच संपूर्ण ब्रह्मांड हे पंचमहाभूतांनी बनलेले आहे अशी आपली धारणा आहे. त्यामुळे पंचमहाभूतांचा समतोल बिघडला की पर्यावरणाचाही समतोल बिघडतो.

पर्यावरण आणि पंचमहाभूतांचा परस्पर संबंध दाखवणारी ही महारांगोळी आहे. रांगोळी मध्ये मधोमध पंचमहाभूतांचे बोधचिन्ह रांगोळीतून साकारण्यात आले आहे. तसेच सूर्य आणि पृथ्वी देखील साकारण्यात आली आहे. मानवी शरीर, पृथ्वी आणि संपूर्ण ब्रह्मांड हे पंचमहाभूतानी बनलेले आहे हे दाखवण्यासाठी रांगोळीमधे त्यांचा अंतरभाव केला आहे. पर्यावरणाचा समतोल बिघडण्यासाठी आपणच जबाबदार आहोत हे दाखवण्यासाठी वृक्षतोड, वायूप्रदूषण, ध्वनीप्रदूषण, रासायनिक खतांचा अती वापर, जलप्रदूषण या गोष्टींचा अंतर्भाव असलेले रांगोळीचित्र रेखाटण्यात आले आहेत.

या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून वितळणारे बर्फ, पूर परिस्थिती, दुष्काळ, पृथ्वीचे वाढलेले तापमान हे नाविन्यपूर्ण पद्धतीने रांगोळीचित्रात रेखाटले आहेत.आणि या सर्व गोष्टींवर उपाय म्हणून वृक्षारोपण, हरित उर्जेचा वापर, अग्निहोत्र, तुळस यासारख्या विषयांची मांडणी करण्यात आली आहे. पर्यावरणाचा बिघडलेला समतोल राखण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे आवश्यक आहे म्हणून वसुधैव कुटुंबकम् असे मोठ्या अक्षरात रेखाटले आहे. आपल्या सनातन वैदिक धर्मामध्ये विचार केलेल्या पृथ्वी, आप(पाणी), तेज(अग्नी), वायू व आकाश या पाच तत्त्वांना पंचमहाभूते म्हणतात ते साकारत पर्यावरण समतोलासाठी उपयुक्त बाबींचा उहापोह करणारी मानवकल्याणकारी अशा या महारांगोळीचे प्रयोजन करण्यात आले होते.

या महारांगोळी साठी एकूण २५०० किलो रंग आणि २००० किलो रांगोळीचा वापर करण्यात आला असून २०० महिलांनी अवघ्या तीन तासांत एकत्रितपणे येऊन हि हि महारांगोळी साकारली होती. या महारांगोळीची संकल्पना पूर्णत्वास उतरवण्यासाठी निलेश देशपांडे यांचे मोलाचे मार्गदर्शन होते. यावेळी सौ.भारती सोनवणे यांनी महारांगोळी प्रमुख म्हणून काम पहिले तर सौ. मंजुषा नेरकर व सौ.सरोजिनी धानोरकर यांनी सहप्रमुख म्हणून काम पहिले, सकाळी ६ वाजता या महारांगोळीचा पहिला बिंदू हा काळाराम मंदिराच्या सत्याग्रहात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम केलेल्या मेघवाल समाजाचे थोर समाजसेवक श्री रामजी पाळजी मारू, यांच्या सूनबाई श्रीमती हिरुबेन धुडा मारू व श्री राम पला मारू, दिपाली गीते यांच्या शुभहस्ते ठेवण्यात आला.

https://twitter.com/my_nmc/status/1637766521597603841?s=20

सायंकाळी ६.वाजता आदिवासी विकास मंडळाच्या आयुक्त नयना गुंडे, मनपा आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते या महा रांगोळीचा अनावरण सोहळा पार पडला. यावेळी नववर्ष स्वागत यात्रा समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती, समितीचे सचिव योगेश गर्गे, संघटक जयंत गायधनी व उपाध्यक्ष राजेश दरगोडे हे देखील पाडवा पटांगण गोदाघाट येथे उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी शिवाजी बोंदार्डे, जयेश क्षेमकल्याणी, विनायक चंद्रात्रे, महेश महांकाळे, रोहित गायधनी, प्रसाद गर्भे, दिपक भगत, यांनी विशेष मेहनत घेतली. ही महारांगोळी पाडवा पटांगणावर दोन दिवसाकरिता ठेवण्यात येणार असून जास्तीत जास्त नाशिककरांनी ती बघण्यासाठी पाडवा पटांगणावर यावे असे आवाहन या सर्व कार्यक्रमांना नाशिककर नागरिकांनी मोठया प्रमाणात उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन नाशिक महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आणि नववर्ष स्वागत यात्रा समिती, नाशिक चे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती, उपाध्यक्ष राजेश दरगोडे, सचिव योगेश गर्गे व संघटक जयंत गायधनी यांनी केले आहे.

महारांगोळीची वैशिष्ट्ये
पाडवा पटांगणावर साकारली ‘पर्यावरण रक्षण या अंतर्गत ‘पंचमहाभूते’ या विषयावरील तब्बल २५ हजार स्वेअर फुटांची भव्य महारांगोळी!

नाशिक येथील पाडवा पटांगण, (जुने भाजी मार्केट), नारोशंकर मंदिराजवळ, पंचवटी येथे २५ हजार स्क्वेअर फुटांची (२५० फूट बाय १०० फूट) ही भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे.

सकारात्मक ऊर्जेने ‘मी’ चे ‘आम्ही’ मध्ये परावर्तन करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

नाशिक महानगर पालिका व नववर्ष स्वागत यात्रा समिती नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांच्या तिसऱ्या दिवशी फाल्गुन कृ. १४ अर्थात सोमवार २० मार्च २०२३ रोजी, सकाळी ६ वाजेपासून ‘पर्यावरण रक्षण या अंतर्गत ‘पंचमहाभूते’ या विषयाला अनुसरून हि “महारांगोळी” साकारण्यात आली आहे.

तब्बल २५००० स्वेअर फुट अशा या महारांगोळी साठी एकूण २५०० किलो रंग आणि २००० किलो रांगोळीचा वापर करण्यात आला असून २०० महिलांनी अवघ्या तीन तासांत हि महारांगोळी साकारली आहे.

कार्यक्रमात उद्या:
मंगळवार (दिनांक २१ मार्च २०२३) रोजी ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन’ म्हणजेच ‘मृत्यंजय दिनानिमित्त’ तरुणांमध्ये स्वत्व जागरण करण्याच्या हेतूने ‘शिवकालीन शस्त्रविदया व त्याच बरोबर भारतीय व्यायाम पद्धती’ ज्यामध्ये सूर्यनमस्कार, चंद्र नमस्कार, भूमिवंदन असे विविध ‘भारतीय व्यायाम आणि प्रात्याक्षिके’ (सायंकाळी ६ वा.) सादर केली जाणार आहे, तसेच ‘शिवकालीन विविध प्रकारचे शस्त्रे’ आबालवृद्धांना जवळून बघता यावी व हाताळता यावी या उद्देशाने ‘शस्त्रात्रांची प्रदर्शनी’ (सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत) मांडणार आहोत. हे प्रात्यक्षिक सव्यसाची गुरुकुलाचे श्री. लखन जाधव गुरुजी आणि त्यांचे विद्यार्थी दाखवणार आहेत. याकरिता सर्व नाशिककर नागरिकांनी मोठया प्रमाणात उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन नाशिक महानगर पालिका आणि नववर्ष स्वागत यात्रा समिती यांनी केले आहे.

Nashik 25 Thousand Sqft Maharangoli New Year Celebration

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

लग्नाला उपस्थित राहिले नाही…. अखेर भाऊबंदकीने घेतला बळी… चांदवड तालुक्यातील धक्कादायक घटना

Next Post

अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संपाबाबत घेतला मोठा निर्णय

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

maha gov logo
महत्त्वाच्या बातम्या

नांदूरमध्यमेश्वरच्या ‘त्या’ जागेच्या प्रकरणात खळबळजनक बाब समोर… तहसिलदारांसह उपअधिक्षकांचे काय होणार?

ऑक्टोबर 14, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

दिवाळीपूर्वीच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाले हे महत्वाचे निर्णय…

ऑक्टोबर 14, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा बुधवारचा दिवस… जाणून घ्या १५ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 14, 2025
महत्त्वाच्या बातम्या

हुश्श… नाशिक शहराने घेतला मोकळा श्वास… खडबडून जागे झालेल्या महापालिकेने केली एवढी कारवाई…

ऑक्टोबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा आठवड्याचा पहिला दिवस… जाणून घ्या, सोमवार, १३ ऑक्टोबरचे राशिभविष्य….

ऑक्टोबर 13, 2025
rain1
मुख्य बातमी

अरे देवा… राज्यात या तारखेपासून पुन्हा वादळी पावसाचा अंदाज…

ऑक्टोबर 13, 2025
rainfall alert e1681311076829
महत्त्वाच्या बातम्या

मान्सून अखेर परतला का? की पुन्हा पाऊस बरसणार? रब्बीच्या हंगामावर काय परिणाम होणार? बघा, हवामानतज्ज्ञ काय म्हणताय….

ऑक्टोबर 12, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी विशेष मदत पॅकेज, सवलती लागू… असा आहे शासन निर्णय…

ऑक्टोबर 12, 2025
Next Post
FrLz IyXwAYr8mC e1679311596718

अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संपाबाबत घेतला मोठा निर्णय

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011