नाशिक – जागतिक छायाचित्रण दिनानिमित्ताने नाशिक छायाचित्रकार संघटना आयोजित कार्यक्रमांमध्ये संघटनेच्यावतीने नाशिक मधील २९ जेष्ठ व उत्कृष्ट फोटोग्राफी क्षेत्रामध्ये काम व पारितोषिके मिळवलेल्या छायाचित्रकारांचा सन्मानपत्र व शाल श्रीफळ देऊन नाशिक महानगरपालिकेचे सन्मान करण्यात आला. महापौर सतीश कुलकर्णी व नाशिक छायाचित्रकार संघटनेचे अध्यक्ष संजय जगताप संस्थापक अध्यक्ष श्री हिरामण सोनवणे व सर्व कमिटी मेंबर यांच्या उपस्थितीत हा सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ छायाचित्रकार अप्पा वाणी, नंदकुमार गोखले, अजित सारंग, रामचंद्र मोरे, बापू गहिवड, सुभाष दहिवेलकर, अर्जुन गुप्ता, अण्णा लकडे, शांताराम शिंपी, बाळू लोखंडे,राजा पाटेकर, प्रशांत खरोटे, प्रकाश नाशिककर, किशोर अहिरराव, सुभाष घुले, हिरामण सोनवणे, विकास जोशी, संतोष लाले, अरुण जाधव, मनोज अंबाडकर, संजय चौधरी, संजय अमृतकर, सोमनाथ कोकरे, किसन बेन्स, राजू जाधव,आनंद बोरा, प्रसाद पवार ,बाबूसेठ ठाकूर, बळवंत पाटील, राजू नाकिल, आदी ज्येष्ठ व उत्कृष्ट छायाचित्रकारांनचा सन्मान संघटनेच्यावतीने करण्यात आला.
याप्रसंगी १५० छायाचित्रकार व त्यांच्या परिवारातील सदस्यांना “कोविडशिल्ड” चा पहिला व दुसरा डोस देण्यात आला. नाशिक महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी बापूसाहेब नागरगोजे, डॉक्टर अजिता साळुंखे, अतिरिक्त आयुक्त डॉक्टर प्रवीण अष्टेकर , व डॉक्टर राजकुमार दायमा, यांच्या सहकार्याने नाशिक मधील छायाचित्रकारांना लस उपलब्ध करून देण्यात आली. याप्रसंगी महापौर सतीश कुलकर्णी यांनी छायाचित्रकार संघटनेच्या कामाचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हिरामण सोनवणे, अध्यक्ष संजय जगताप, सेक्रेटरी सुरेंद्र पगारे, उपाध्यक्ष पंकज अहिरराव, सहसेक्रेटरी नंदू विसपुते, सल्लागार प्रताप पाटील ,वामनराव दंदी, कमिटी मेंबर किरण मुर्तडक, दिनेश वैष्णव,विलास अहिरे, गिरिष भोळे, प्रशांत तांबट, धनराज पाटील, सौरभ अमृतकर, संदीप भालेराव, सुनील जगताप, रवींद्र गवारे, पंकज जोगळेकर, योगेश चव्हाणआदि छायाचित्रकार उपस्थित होते.