नाशिक – गेल्या १ मे पासून १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण सुरू झाले आहे. नाशिक शहरातील या लसीकरणाबाबत नाशिक महापालिकेने आज महत्वाची माहिती दिली आहे. ती पुढीलप्रमाणे
१ मे २०२१ पासून १८ ते ४४ वयोगटातील सर्व नागरिकांना लसीकरण करण्यात चालू करण्यात आले आहे . यासाठी www.cowin.gov.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. लसीकरण केंद्रावरती कोणालाही नाव नोंदणी करून लस घेता येणार नाही याची नागरिकांनी काळजी घ्यावी. लसीकरणासाठी नाव नोंदणी करत असताना जे कागदपत्र अपलोड केली असतील त्यापैकी १ आयडी प्रूफ म्हणून सोबत घेऊन जाणे बंधनकारक आहे. खालील लसीकरण केंद्रावर १ मे २०२१ पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी सुरु झाली आहे.
नाशिक महानगरपालिका क्षेत्रात पुढील प्रमाणे केंद्र सुरु करण्यात आली आहेत.
कोविशील्ड ही लस इंदिरा गांधी हॉस्पिटल, पंचवटी कारंजा आणि नाशिकरोड शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र खोले मळा येथे उपलब्ध आहे.
कोवॅक्सिन लस ही मायको दवाखाना, पंचवटी, मायको सातपूर, मनपा विभागीय कार्यालया मागे आणि सिडको शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, अचानक चौक येथे लसीकरणासाठी उपलब्ध आहे.
वरील लसीकरण केंद्रावर सकाळी १० ते ४ वेळेत लसीकरण सुरु राहणार आहे. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनी आदल्या दिवशीच लसीकरणाची नोंदणी सायंकाळी ७ ते १० यावेळेत केल्यास नोंदणी करता येऊ शकेल. लसीकरणाचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन नाशिक महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. लसीकरण केंद्रावर अनावश्यक गर्दी करू नये. जेणे करून कोविड संसर्ग वाढू नये, असेही मनपा प्रशासनाने सांगितले आहे.