मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेली HYROX International Fitness Race नुकतीच मुंबईतील नेस्को सेंटर येथे पार पडली. “World Series of Fitness Racing” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्पर्धेत वेगळा फॉरमॅट असतो – ८ किमी धावणे व ८ वर्कआउट स्टेशन यांचा संगम, ज्यातून खेळाडूंची सहनशक्ती, ताकद आणि स्टॅमिना यांची खरी कसोटी लागते.
या उच्च दर्जाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत नाशिक शहरातील फिटनेस समुदाय स्ट्राईकिंग स्ट्रायडर्स यांनी अनेक विजेतेपदे पटकावून आणि उत्तम वेळा नोंदवून शानदार कामगिरी केली आणि ह्या स्पर्धेत नाशिक च वर्चस्व सिद्ध केले.
स्ट्राईकिंग स्ट्रायडर्स विजेते :
• विक्रांत अव्हाड व डॉ. धनंजय दुबेरकर – १:२२:२३ (वय गट ४५–५०, प्रथम क्रमांक)
• अलिअसगर अदमजी व शीतल संघवी – १:२४:०३ (वय गट ५०–५४, प्रथम क्रमांक)
• प्रशांत डब्री – २:०२:४६ (वय गट ६०–६५, द्वितीय क्रमांक)
• अलिअसगर अदमजी, शीतल संघवी, अमोल करंजकर व डॉ. रुशिका पटेल – १:२१:१९ (मिक्स रिले ४०+, प्रथम क्रमांक)
अन्य उल्लेखनीय कामगिरी :
• महेंद्र छोऱिया व दीपाली गलांदे – १:४०:३६ (४०–४४)
• ऋत्विक काठे – १:२७:५४ (२५–३०)
• अमोल करंजकर – १:३१:३९ (४५–५०)
• डॉ. रैना शेख व श्वेता चौधरी – २:१३:४२ (४०–४४)
• गणेश ढाकणे व डॉ. राहुल मोदगी – १:४२:३८ (४०–४४)
• डॉ. रुशिका पटेल व डॉ. सागर पाटील – १:३३:२४ (मिक्स डबल्स ४०–४४)
• डॉ. प्रशांत देवरे व डॉ. कुणाल तोरणे – १:२४:५२ (मेंस डबल्स ४०–४४)
• डॉ. आनंद दिवाण व डॉ. गौरी दिवाण – २:००:४१ (मिक्स डबल्स ४५–४९)
विशेष ठळक बाब :
भारतासाठी अभिमानाचा क्षण – अलिअसगर अदमजी व शीतल संघवी यांनी या वर्षी तीन वेळा हाय्रॉक्स स्पर्धेत विजेतेपदे मिळवून आता अधिकृतपणे स्वीडन येथे होणाऱ्या २०२६ वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी पात्रता मिळवली आहे. त्यांनी भारताच्या फिटनेस इतिहासात नवा मानबिंदू निर्माण केला आहे.
हाय्रॉक्स मुंबई स्पर्धेत स्ट्राईकिंग स्ट्रायडर्सच्या या कामगिरीमुळे त्यांच्या फिटनेस, टीमवर्क व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा उत्कृष्टतेचे उत्तम दर्शन घडले.