नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रीय विकास मंडळ संचलित, नववर्ष स्वागत यात्रा समिती तर्फे नियोजित अंतर्नाद, महावादन व महारांगोळी हे सर्व सांस्कृतिक कार्यक्रम पुन्हा एकदा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने शुक्रवार १५ एप्रिल २०२२ रोजी स्वरभास्कर पंडित भीमसेन जी जोशी यांना समर्पित “अंतर्नाद” (१००० विद्यार्थ्यांचे हिंदुस्थानी शास्त्रीय गायन, नृत्य, वादन कलेचे सादरीकरण) , शनिवार १६ एप्रिल २०२२ रोजी महावादन (१००० ढोलांचे समूह वादन) आणि रविवार १७ एप्रिल २०२२ रोजी ‘महान जनजातीय वीरांना समर्पित’ “महारांगोळी” (२५००० स्क़्वे.फ फुट रांगोळी) होणार असून, सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत, पाडवा पटांगण (जुने भाजी पटांगण), गोदाघाट, पंचवटी , नाशिक याठिकाणी हे सर्व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.
याकरिता महावादनातील सर्व सहभागी वादक, अंतर्नाद मधील सर्व गुरु व सर्व शिष्य आणि त्यांचे पालक, महारांगोळी च्या सर्व सहभागी महिला, स्वयंसेवक यांचा सराव मोठ्या उत्साहात सुरु आहे.
गोदातीरी संस्कृती जपणारे विविध सामूहिक कार्यक्रम घेण्यात येणार असून कार्यक्रमाचे उद्देश्य हे आपल्या भारतीय संस्कृती चे संवर्धन, जतन आणि दर्शन हा आहे. कार्यक्रमाचे विषय हे नेहमीच राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक समरसता, पर्यावरण रक्षण, शिक्षण सेवा, महिला सबलीकरण, गोसेवा, सामाजिक एकता, इत्यादी प्रमाणे असतात. या वर्षी “स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव” हा सर्व कार्यक्रमांचा विषय आहे.
तरी अंतर्नाद, महावादन व महारांगोळी या सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांची पूर्वतयारी पूर्ण होत आली असून यंदाही अधिकाधिक भव्य स्वरुपात या सर्व कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे, जास्तीत जास्त नाशिककरांनी या कार्यक्रमांना उपस्थित रहावे असे आवाहन नववर्ष स्वागत यात्रा समिती, नाशिक चे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती व सचिव जयंत गायधनी यांनी सांगितले आहे.
भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम
महारांगोळी: नाशिक शहराच्या सर्व भागातून व स्तरातून महिला एकत्र येऊन सुमारे २५००० चौरस फुट रांगोळी साकारतात. त्या साठी त्याचे रांगोळी चे कौशल्य विकास प्रशिक्षण राबविले जाते.
महावादन: नाशिक नगरीतील सर्व ढोल पथक एकत्र येऊन महावादन हा सामुहिक ढोल ताशा वादनाचा कार्यक्रम साकारत असतात. ढोलाच्या नादातून मोठ्या प्रमाणत सकरात्मक उर्जा तयार होत असते त्यामुळे नवीन वर्षाचे स्वागत हे सकारात्मक उर्जेने व्हावे हा उद्देश असतो. सदर कार्येक्रमा मध्ये १००० पेक्षा जास्त वादक सहभागी असतात. तरुण तरुणींमध्ये या कार्यक्रमाचे प्रचंड आकर्षण आहे व सहभाग ही लक्षणीय आहे.
अंतर्नाद: हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातल्या विविध वादयांचे वादक, गायक व नृत्य कलाकार एकत्र येऊन सामूहिकरीत्या अंतर्नाद हा कार्यक्रम सादर करतात .या सर्व कार्यक्रमांना रसिक नाशिककर नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थितीत राहून आनंद घेतात.