मुंबई – आपण तेच तेच काम करून कंटाळलो की आता कुठेतरी बाहेर जायला हवे, असे सतत म्हणत असतो. पण बाहेर म्हणजे गावाच्या, शहराच्या बाहेर असा सरळ स्पष्ट अर्थ असतो. मात्र आता तुम्ही मोठे स्वप्न बघू शकता. म्हणजेच पृथ्वीवरच राहून कंटाळा आला आहे आणि पृथ्वीपासून लांब जायचे आहे, असेही स्वप्न प्रत्यक्षात उतरवू शकता. त्यासाठी नासाने व्यवस्था केली आहे.
नासाने एक वर्ष मंगळावर राहण्यासाठी चार लोकांचे अर्ज मागविले आहे. या माध्यमातून नासा मंगळ ग्रहावर अंतराळ यात्रेच्या त्यांच्या मिशनमध्ये येणाऱ्या अडचणींचा सामना करण्यासाठी स्वतःला सज्ज ठेवू पाहात आहे. याअंतर्गत अंतराळ यात्रेकरूंना अशा एका जागेवर राहावे लागेल जी मंगळ ग्रहासारखी असेल. त्यांना अश्या आव्हानांचा सामना करावा लागेल, जी आव्हाने मंगळग्रहावर सुद्धा असू शकतात.
नासाने चार लोकांचे अर्ज मागविले आहेत. 1 वर्ष मंगळ ग्रहासारख्या जागेवर राहण्याची तयारी असणाऱ्यांनीच हा अर्ज करावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. ह्युस्टनमध्ये जॉन्सन स्पेस सेंटरच्या इमारतीत 1700 चौरस फुट जागेत थ्रीडी प्रिंटरच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या मार्स ड्यून अल्फामध्ये हे चार लोक राहतील. मंगळ ग्रहावर भविष्यातील वास्तविक जीवनातील आव्हानांच्या तयारीसाठी आम्ही हे करीत आहोत, ते आभासी पद्धतीत असले तरीही आव्हाने तेवढीच राहतील, असे नासाने म्हटले आहे.
हे करू शकतात अर्ज
नासाने आपले हे अभियान जागतिक व्यासपिठावर जाहीर केले असले तरीही यात ज्या चार नागरिकांचे अर्ज मागविले आहेत, ते अमेरिकेतीलच असले पाहिजेत, अशी अट घालण्यात आली आहे. सोबतच त्यांचे वय 30 ते 35 वर्षे असावे, असेही नासाने म्हटले आहे. उत्तम आरोग्य, धुम्रपानाचे व्यसन नसणे याही गोष्टी अनिवार्य केल्या आहेत.
https://twitter.com/NASAMars/status/1423709420215840770