महेश शिरोरे, देवळा
नरकोळ येथील आशापुरी मंदिराच्या मंडळाच्या कार्यकारिणीची पहिली सभा येथील मंदिराच्या प्रांगणात सकाळी सर्वांच्या साक्षीने खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सदर सभेमध्ये मोठ्या प्रमाणांत सभासदांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. तर दुपारी बारा वाजता आई भगवती ची आरती करून सभेस सुरुवात करण्यात आली. स्वागत व प्रास्ताविक महेश शिरोरे यांनी केले. सभेच्या अध्यक्षस्थ्यानी देविदास जगन्नाथ कोठावदे हे होते. अध्यक्षपदाची सूचना भालचंद्र कोठावदे यांनी मांडली तर त्या सुचनेस अनुमोदन महेश शिरोरे यांनी दिले.
सभेत खालील प्रमाणे विषय घेण्यात आले त्यात पुढीलप्रमाणे १) भगवतीच्या प्रांगणात आई आशापुरी मातेच्या सेवेसाठी जाणाऱ्या भाविकांना राहण्यासाठी १०००स्केवेर फुटाचे भक्तनिवास बांधण्यात येणार असून त्या वरील खोलीच्या बांधकामासाठी समाजबांधवांनी सर्वोतोपरी मदत करण्याचे आव्हान सचिन कोठावदे यांनी केले. २) तर भक्तनिवास व मंदिराच्या जागेसाठी लागणाऱ्या संपूर्ण जागेचे दान केले असल्याचे जागा मालकांनी यावेळी उपस्थिताना सांगितले.३) मंदिराच्या मागील बाजूस असणाऱ्या महादेव मंदिराच्या बांधकाम करण्यात यावे.
४) आशापुरी मंदिराच्या ट्रस्टसाठी परवानगी घेण्यात येऊन लवकरात लवकर ट्रस्ट स्थापन करण्यात यावे.५)आई भगवती मातेचा गाभारा मोठा करण्यात यावा. ६) सभा मंडपात सूचना फलक लावण्यात यावे. ७) सोहळे घालूनच मातेचे दर्शन करण्यात यावे. ८) कार्यकारनितल्या सभासदांनी किमान पाच पाच लोकांना तरी नरकोळ येथील देवीच्या दर्शनासाठी आणणे.
९) मंदिराच्या जागेचे लेंड सर्व्हे करून मोजमाफ करणे, १०) जानेवारी महिन्यातील १६ जानेवारी ला कार्यकारणीची मीटिंग आयोजित केलेली असून सर्वांनी सकाळी ११:०० वाजता उपस्थित राहण्याचे आव्हान करण्यात आले आहे. ११) भक्त निवासात आचारी , ठेवण्याबाबत चर्चा करण्यात आली. १२) मंदिराच्या आवारात लहान मुलांसाठी खेळायला खेळणी सह ,गार्डन तयार करणे.
१३) संपूर्ण मंदिराच्या आवराला तार कंपाऊंड करण्यात यावे असे विषय यावेळी घेण्यात आले.यावेळी नाशिकचे विनोद कोठावदे , दिनेश वाणी , महेश शिरोरे, विनोद देवघरे, दिंगबर घरटे,व मालेगाव व पिंगळवाडे करानी देखील मंदिराच्या विकासासाठी मुद्देसूद प्रश्न उपस्थित करून मनमोकळी चर्चा देखील यावेळी केली. विषय पत्रिकेवरील सर्व विषयांचे वाचनही करण्यात आले. .सभा संपलेनंतर डी के कोठावदे यांनी आभार मानले.
सर्वांनी स्वादिष्ट स्नेह भोजनाचा आस्वाद देखील घेतला.सभासदांनी विचारलेल्या विषय पत्रिकेवरील सर्व प्रश्नांना तसेच विषयपत्रिके व्यतिरिक्त सुद्धा विचारलेल्या सर्व प्रश्नांना समर्पक व समाधानकारक उत्तरे देण्यात आली. विषय पत्रिकेवरील सर्व विषय सभासदांनी बहुमतांनी मंजूर केले. सभेचे उत्कृष्ठ नियोजन केल्याबद्दल कार्यकारी मंडळाच्या वतीने भालचंद्र नाना कोठावदे ,श्री सचिन भाऊ कोठावदे यांचा तर हेमंत भाऊ शिंदे ,व बापूराव शिंदे या जागा मालकांनी मंदिराच्या विकासासाठी जागेचे भूदान केल्यामुळे त्यांच्याही या ठिकाणी यथोचित सत्कार करण्यात येऊन अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.
यावेळी भक्तनिवास बांधण्यासाठी समाजबांधवांनी स्वखुशीने भक्तनिवास बांधकामासाठी देणगी देण्याचे देखील जाहीर केले.अजून कोणाला खोलीच्या बांधकामासाठी आर्थिक मदत देण्याची इच्छा असेल त्यांनी स्वखुशीने आपापली नावे द्यावी असा ठराव कार्यकारणी मंडळाच्या मीटिंग मध्ये करण्यात आला. कार्यकारिणी मंडळाच्या सभेस सर्व कार्यकारणी पदाधिकारी व सेवेकरी उपस्थित होते.
“आशापुरी मातेच्या मंदिर परिसरात खूप निसर्ग रम्य वातावरण असूनही त्या ठिकाणी भक्तांना राहण्यासाठी कोणत्याही प्रकारची निवासाची सुविधा नसल्याने खूप मोठ्या प्रमाणात अडचणी येत असून, मंदिराच्या कार्यकारणी मंडळाच्या सभेमध्ये भक्तनिवास व खोलीच्या बांधकामासाठी दानशूर पुढे येत असल्याने मंदिराचा कायापालट होईल.
– भालचंद्र कोठावदे, मंदिर विश्वस्त, नरकोळ, ता. बागलाण