मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील सत्ता संघर्षाची सुनावणी थोड्याच वेळात होणार असताना राज्यात विविध चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळेच काय झाडी, काय डोंगर, काय हिरवळ… आज वाट पाहतोय तुमची नरहरी झिरवळ हा डायलॉग सध्या गाजत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत आणि महाविकास आघाडीच्या ट्विटर हँडलवरुनही हा डायलॉग शेअर करण्यात आला आहे.
राज्याच्या राजखामरणात मोठा भूकंप झाला त्यावेळी विधानसभेच्या उपाध्यक्षपदी नरहरी झिरवाळ हे होते. आताही तेच या पदावर आहेत. १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दाच आता केंद्रस्थानी आहे. शिवसेनेतील मोठी फूट आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयातील संघर्ष यावरुन बरेच रणकंदन झाले आहे. त्यातच बंडखोर आमदार सूरत, गुवाहाटी मार्गे मुंबईत विधानसभेमध्ये दाखल झाले होते. बंडखोर आमदारांपैकी एक असलेल्या शहाजी बापू पाटील यांचा एक डायलॉग त्यावेळी प्रचंड फेमस झाला. काय झाडी, काय डोंगर, काय हिरवळ अशा स्वरुपाचा हा डायलॉग होता. गुवाहाटीच्या पंचतारांकीत हॉटेलमधू त्यांनी हा डायलॉग फोनवर त्यांच्या कार्यकर्त्याला ऐकवला होता.
आज सुनावणी होत असतानाच शहाजी बापू पाटील यांच्या डायलॉगची सुधारीत आवृत्ती व्हायरल होत आहे. कारण, सर्वोच्च न्यायालय १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे सोपविण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यावरुनच काय झाडी, काय डोंगर, काय हिरवळ… आज वाट पाहतोय तुमची नरहरी झिरवळ हा डायलॉग सध्या चर्चेला आला आहे.
https://twitter.com/rautsanjay61/status/1656489962697801734?s=20
Narhari Zirwal Dialogue Famous Todays Verdict