बुधवार, जून 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अगस्ति ऋषी मंदिराच्या विकासासाठी तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर…मंत्री झिरवाळ यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन

by India Darpan
फेब्रुवारी 26, 2025 | 8:07 pm
in संमिश्र वार्ता
0
zirwal

शिर्डी (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सामाजिक दायित्व निधीतून अगस्ति ऋषी मंदिरासाठी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल, राज्य शासन मंदिराच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले.

प्रादेशिक पर्यटन योजनेतून अकोले येथील अगस्ति ऋषी मंदिराच्या विकासासाठी तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून सभामंडप आणि संरक्षक भिंतीच्या कामांचे भूमिपूजन श्री. झिरवाळ यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार डॉ. किरण लहामटे, त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. पुष्पाताई लहामटे, नगरविकास विभागाचे उपसचिव विजय चौधरी, तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे, अगस्ति ऋषी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. के. डी. धुमाळ, विश्वस्त परबत नाईकवाडी, गुलाबराव शेवाळे, बाळासाहेब भोर, ह.भ.प. गणेश महाराज वाकचौरे, माजी नगराध्यक्षा सोनालीताई नाईकवाडी, देवस्थानचे व्यवस्थापक रामनाथ मुतडक आदी उपस्थित होते.

अगस्ति महाराजांचे दर्शन व महापूजेचा लाभ घेण्याने आनंद झाल्याचे नमूद करून मंत्री झिरवाळ म्हणाले, अगस्ति ऋषींची महती संपूर्ण देशभर पसरलेली आहे. प्रभू रामचंद्रांनी या आश्रमात तीन दिवस मुक्काम केला होता. असे पवित्र स्थान देशभरात अन्यत्र कुठेही नाही, असे त्यांनी सांगितले.

दूध भेसळीविरोधात शासनाने कठोर पावले उचलली असून मुंबईतील चार नाके सील करण्यात आले आहेत. एकूण ९८ टँकर तपासण्यात आले, त्यापैकी काही परत पाठवण्यात आले. पनीर व खव्यामध्ये भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आमदार लहामटे म्हणाले, शासनाकडून दूध भेसळ रोखण्यासाठी तसेच तरुणांमध्ये वाढणारी व्यसनाधीनता थांबवण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या जात आहेत. मंदिराच्या विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता पडू दिली जाणार नाही.

उपसचिव विजय चौधरी म्हणाले, अन्न व औषध प्रशासन विभागात नुकतीच २८० अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यामध्ये अकोले तालुक्यातील आठ उमेदवारांचा समावेश आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. के. डी. धुमाळ यांनी केले. तत्पूर्वी, महाशिवरात्री निमित्त पहाटे तीन वाजता मंत्री नरहरी झिरवाळ यांनी महापूजा केली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

जिल्हा रूग्णालयाच्या डॉक्टरकडे दहा लाखांच्या खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

Next Post

आसाममध्ये रिलायन्सची ५० हजार कोटींची गुंतवणूक….

India Darpan

Next Post
mukesh ambani reliance

आसाममध्ये रिलायन्सची ५० हजार कोटींची गुंतवणूक….

ताज्या बातम्या

Untitled 16

ऐश्वर्या गौडा आणि इतर १७ आरोपींविरुद्ध ईडीने केला खटला दाखल…विविध उच्च प्रोफाइल राजकारण्यांशी जवळीक

जून 25, 2025
Untitled 72

इराणवर युद्धबंदीचं उल्लंघन केल्याचा इस्रायलच्या आरोप, इराणचा इन्कार

जून 25, 2025
modi 111

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉरिशसच्या पंतप्रधानांशी दूरध्वनीवरून साधला संवाद…झाली ही चर्चा

जून 25, 2025
crime11

सायबर भामट्यांनी शहरातील चार जणांना साडे ५५ लाख रूपयांना घातला गंडा….अशी केली फसवणूक

जून 25, 2025
ajit pawar meeting 1024x683 1 e1750813882772

आता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ‘सीट्रीपलआयटी’ केंद्र…एमआयडीसी’ मार्फत जागा; जिल्हा नियोजन समितीमार्फत १५ टक्के निधी

जून 25, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींवर कौतुकाचा वर्षाव होईल, जाणून घ्या, बुधवार, २५ जूनचे राशिभविष्य

जून 24, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011