मुंबई – बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान याचे घर असलेल्या मन्नत येथे आज दुपारी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) पथक दाखल झाले. हा कुठलाही छापा नसल्याचे एनसीबीने स्पष्ट केले आहे. शाहरुखचा मुलगा आर्यन हा क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणी गेल्या १८ दिवसांपासून तुरुंगात आहे. आज सकाळीच शाहरुखने आर्यनची भेट घेतली होती. त्यात आता त्याच्या घरी एनसीबीचे पथक आल्याने सर्वत्र चर्चांना उधाण आले आहे. हा छापा असल्याची अफवा पसरली. मात्र, काही कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी पथक गेल्याचे एनसीबीने स्पष्ट केले आहे. क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणी आर्यन आणि शाहरुख यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच असल्याचे दिसून येत आहे.