नाशिक – नाशिक येथे शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग येथे पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर देत पलटवार केला. यावेळी शिवसेनेची वाट लावण्यासाठी राऊत वक्तव्य करतात. राऊतमुळे शिवसेना वाढत नाही, अधोगतीकडे चालली ती खड्यात चालली. तो कोण आहे शिवसेनेचा ? तुला कोण विचारतो ? मालक, नाही संपादक नाही, कार्यकारी संपादक असे सांगत त्यांनी चिमटा काढला. शिवसेनेकडे संपादकपदासाठी व बोलायला माणूस नाही असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी तुमच्या मालकाचे मुले काय करता हे बघा, संजय राऊत हे माहित काढण्यासाठी प्रवृत्त करतात असेही त्यांनी सांगितले. राऊत यांची बौध्दीक लोकांमध्ये प्रतिमा अजिबात चांगली नाही असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी वैयक्तीक गोष्टी थांबल्या नाही तर प्रहारमधून पोलखोल करुन सामनाला उत्तर देण्याचा इशाराही दिला. यावेळी त्यांनी राज्य सरकार व शिवसेनेवरही हल्लाबोल केला.
या पत्रकार परिषदेत त्यांनी नारायण राणे विरोधात बोलले की शिवसेनेत मोठे पद मिळते असे सांगितले. शिवसेना घडायला आमचाही काही हातभार असल्याचे सांगितले. आता बस करा, महाराष्ट्रात कोणतेही काम विनाअडथळा करणार असल्याचे ते बोलले, जनआशीर्वाद यात्रेबाबत बोलतांना ते म्हणाले की, जनआशीर्वाद यात्रेला काही ठिकाणी अपशकून झाले, मांजर आडवी गेली, जनआशीर्वाद यात्रा अडवण्याचे मंत्र्याचे आदेश दिल्याचा आरोपही त्यांनी केला. तरी जनआशीर्वाद यात्रेला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी त्यांनी राणेच्या खात्याला निधी देता येत नसल्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या टीकेलाही उत्तर देत पलटवार केला. ते म्हणाले अजित पवार अज्ञानी आहे, पवारांनी स्वत;चे खाते सांभाळावे. अजून मी राष्ट्रवादीकडे आलो नसल्याचेही त्यांनी सांगितले. फडणवीस आणि ठाकरे यांच्या बंद दाराआड चर्चेवर विचारलेल्या प्रश्नांवर ते म्हणाले की, कुणी कोणाला भेटले तरी मला फरक पडत नाही