रत्नागिरी – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरातून पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. त्यानंतर अडीच तासानंतर त्यांना महाड पोलिस स्थानकात नेण्यात आले आहे. यावेळी पोलीसांचा चोख बंदोबस्त होता. महाड येथे पत्रकार परिषदेत राणे यांनी मुख्यमंत्र्याविरोधात आक्षेपार्ह विधान केले होते. त्यामुळे येथे आता पुढील कारवाई होणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरातून पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर या कारवाई विरोधात भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड विरोध केला. यावेळी अटक वॅारंट दाखवा असे सांगत पदाधिका-यांनी विचारणा केली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याविषयी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आक्षेपार्ह विधान केल्यानंतर त्यांच्या विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाला. त्यानंतर विविध ठिकाणी असेच गुन्हे दाखल झाले. त्यामुळे राणेंना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना कुठे नेले जाते याबाबत विचारले जात होते. पण, आता त्यांना महाड येथे नेण्यात आले आहे.