रत्नागिरी – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरातून पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. पोलीसांचा चोख बंदोबस्त ही कारवाई करण्यात आली आहे. ताब्यात घेण्याअगोदर भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड विरोध केला. यावेळी अटक वॅारंट दाखवा असे सांगत पदाधिका-यांनी पोलिस कारवाईला विरोध केला. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याविषयी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आक्षेपार्ह विधान केल्यानंतर त्यांच्या विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाला. त्यानंतर विविध ठिकाणी असेच गुन्हे दाखल झाले. त्यामुळे राणेंना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना कुठे नेले जाते याबाबत अद्याप पोलीसांनी काहीच स्पष्ट केलेले नाही.