विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोना महामारीच्या दुसर्या लाटेचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला असून, ऑक्सिजनविना लोकांचा श्वास कोंडला आहे. मात्र यावर अद्याप रामबाण इलाज सापडू शकलेला नाही. त्यामुळे अशा बहुरूपी विषाणूपासून बचाव आवश्यक आहे. विषाणूपासून सुरक्षित राहण्यासाठी आयआयटीच्या स्टार्टअपमध्ये नॅनोशॉट स्प्रे बनविण्यात आला आहे. कार्बन हायब्रिड सरफेस किटाणूनाशक स्प्रे बहुउद्देशीय असून, त्याचा ९६ तासापर्यंत प्रभाव राहू शकतो. तो ३० सेकंदाच्या आतच जीवाणू आणि विषाणूचा खातमा करण्यास सुरुवात करतो.
तांत्रिक तज्ज्ञांच्या दाव्यानुसार, हा स्प्रे १० मिनिटात ९९ टक्के किटाणूंना मारण्याची क्षमता ठेवतो. याचा उपयोग फरशी, कपडे आणि भांडे यांना सोडून इतर ठिकाणी करता येतो. दिल्ली आयआयटीच्या रमाजा जेनोसेंसरने हा नॅनोशॉट प्रे बनविला आहे. रमजा जेनोसंसरच्या संस्थापक डॉ. पूजा गोस्वामी म्हणाल्या, की एखाद्या पृष्ठभागावर स्प्रे शिंपडला की ३० सेकंदाच्या आताच जीवाणू आणि विषाणूंचा खातमा होण्यास सुरूवात होते. सर्व प्रकारच्या जीवाणू आणि विषाणूंना या स्प्रेद्वारे संपवू शकतो.
स्प्रेचा दुष्परिणाम नाही
प्रा. गोस्वामी यांच्या माहितीनुसार, या स्प्रेमध्ये कोणत्याही प्रकरचे विष नाहीये. त्याचा वापर केल्यानंतर कोणतीही अॅलर्जी किंवा त्वचेची जळजळ होत नाही. या स्प्रेला तीन वेगवेगळ्या प्रकारात पॅक करण्यात आले आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे यासोबत जैविक अल्कोहल फ्री देण्यात आले आहे. याचा उपयोग पुस्तके, लिफ्ट, कंट्रोल पॅनल, कारचे डॅशबोर्ड, टॅबलेट, पर्स, सामान, मायक्रोव्हेव आणि इतर उत्पादनांवरील विषाणूला रोखण्यासाठी केला जाऊ शकतो. त्याशिवाय स्वयंपाकघरातील स्लॅब, डायनिंग टेबल, फ्रीजचा वरील भाग, मेट्रो, बस, रेल्वे, वॉशरूम, रेस्टॉरंट, विमानतळ या ठिकाणीही याचा वापर करता येऊ शकतो.