अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
राज्यात सर्वत्र शिवसेनेच्या बंडखोर आमदारांविरोधात शिवसैनिकांनी रणशिंग फुंकलेले असतांना नांदगाव मतदार संघाचे शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्या समर्थनार्थ शिवसैनिक एकवटलेले पाहायला मिळाले. एकीकडे शिवसैनिक आमदारांच्या कार्यालयाला लक्ष करत असतांना दुसरीकडे आमदार सुहास कांदे यांच्या कार्यालयाला शिवसैनिकांनी संरक्षण देत समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. आमदार कांदे यांच्या बंडखोरीला एकप्रकारे नांदगावमधून समर्थन असल्याचे चित्र दिसत आहे. तर दुसरी मनमाड मध्ये जुन्या जेष्ठ शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांचे समर्थन केले आहे.