सोमवार, नोव्हेंबर 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

लसीकरणात नंदुरबार जिल्ह्याने मिळविले हे उल्लेखनीय यश

जून 12, 2021 | 12:14 pm
in संमिश्र वार्ता
0

प्रतिनिधी, मुंबई/नंदुरबार
महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातल्या सिंद गव्हाण, पुरूषोत्तमनगर आणि सागळीया  तीन गावांनी ४५ वर्षावरील लसीकरणाचे निर्धारीत केलेल उदिष्ट १०० टक्के  साध्य केले आहे . आदिवासी बहुल भागात लसीकरणाबाबत असलेले गैरसमज आणि अफवा यांच्यावर लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या एकत्रित प्रयत्नांद्वारे मात केली आहे.
भारतासह संपूर्ण जग एक वर्षाहून अधिक काळापासून कोविड19 या महामारी चा सामना करत आहे. चाचणी, मागोवा, उपचार आणि कोविड प्रतिबंधक वर्तन याबरोबरच  लसीकरण हा केंद्र  सरकारच्या महामारी विरोधातल्या लढ्यातील धोरणाचा अविभाज्य घटक आहे.
या महामारीच्या  लाटा ठराविक कालावधीनंतर येत राहतील आणि यापार्श्वभूमीवर  देशातील जास्तीत जास्त नागरिकांचं लसीकरण  करण्यासाठी केंद्रसरकारने 16 जानेवारी 2021 पासून देशात लसीकरण मोहिम सुरू केली.  आहे .या लसीकरण मोहेमेत आतापर्यंत  24.6 कोटी इतक्या  लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.
प्रचंड विविधता असलेल्या आपल्या विशाल देशात लसीकरण कार्यक्रमाची अंमलबजावणी हे प्रशासकीय दृष्टीने आव्हान तर आहेच शिवाय ग्रामीण आणि अदिवासी भागातील जनतेला लसीकरणाचे महत्त्व पटवून देणे हे  त्याविषयी असलेल्या गैर समजुती आणि चुकीच्या धारणा यामुळे त्याहून अवघड ठरते.
 महाराष्ट्रातील आदिवासी बहुल नंदुरबार जिल्ह्यातही   लसीकरण केल्यामुळे कोरोना होतो, लस घेतल्यानंतर ताप आला आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले तर तो रुग्ण जिवंत परत येत नाही अशा प्रकारच्या अफवांमुळे सुरुवातीला सुरुवातीचा दिड महिना नागरिकांनी लसीकरणाला प्रतिसाद दिला नाही. त्यांनतर प्रशासनाने नागरिकांच्या मनातील हे गैरसमज दूर करण्यासाठी जिल्ह्यात त्यासंदर्भात  बहुस्तरीय जनजागृती अभियान राबविण्यास सुरुवात केली  आणि नागरिक लसीकरण करण्यास उद्युक्त झाले असे  जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौदळ यांनी याविषयी पत्र सूचना कार्यालयाला  सांगितले .
17U5W
या जनजागृती अभियानात जिल्हाधिकारी, खासदार,आमदार आणि इतर वरिष्ठ नेते ,अधिकारी यांनी गावभेटीच्या माध्यमातून गावकर्यांशी संवाद साधला , त्यानंतर लसीकरणाविषयीचे  आदिवासींमध्ये असलेले गैरसमज दूर करणाऱ्या ऑडीओ क्लिप्स स्थानिक आदिवासी भाषेत तयार करून त्यांच्यापर्यत पोचविण्यात आल्या.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत आकाशवाणी , दूरदर्शन यांनी लसीकरणाबाबत वेळोवेळी माहिती देऊन गैरसमज दूर केले त्याबरोबरच  पुण्यातील प्रादेशिक लोक संपर्क ब्युरोतर्फे महाराष्ट्रात कोविड-19 लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत जनजागृतीविषयक व्यापक मोहिमेअंतर्गत 36 जिल्ह्यांत 16 व्हॅन्स द्वारे फिरती बहुमाध्यमी प्रदर्शने आयोजित करण्यात आली. या व्हॅन्सनी  प्रत्येक दिवशी सुमारे शंभर किलोमीटर प्रवास करून रस्त्यावरच्या गावागावांमध्ये  लस तसेच लसीकरणाविषयी पसरलेले गैरसमज आणि अफवांबाबत जनजागृत केली.या उपक्रमा अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातही 25 फेब्रुवारी ते 6 मार्च 2021 या कालावधीत लसीकरणाबाबत जनजागृती मोहिम राबविण्यात आली होती.
2Z6QM
3328V
अभियानाच्या  दुसऱ्या टप्प्यात लसीकरणासाठी या गावकर्यांच्या  जनजागृतीसाठी कॉर्नरसभा , ग्रामसभा , दवंडी , अशा विविध प्रकारच्या प्रचार साधनांचा वापर तर केलाच शिवाय  प्रत्येक गावात ग्रामसेवक, आशासेविका आणि मुख्याध्यापक / शिक्षक यांचे पथक तयार करून त्यांनी घरोघरी भेटी देऊन लोकांचे मन वळविण्याचे प्रयत्न केले. याशिवाय गावातील नोकरदार आणि प्रतिष्ठित व्यक्तीना  त्यांच्या घरातील व्यक्ती आणि नातेवाईक यांच्याशी याविषयी बोलायला सांगितले.  ग्राम पंचायतीच्या मासिक सभेत सदस्यांवर वार्ड निहाय लसीकरण करून घेण्याची जबाबदारी टाकली असे  रौदळ यांनी याविषयी सांगितले.
4YYOC
5OHUB
प्रशासनाच्या या प्रयत्नांना हळूहळू यश येत असून नंदुरबार तालुक्यातील सिंद गव्हाण, शहादा तालुक्यातील पुरूषोत्तमनगर आणि नवापूर तालुक्यातील सागळी या तीन गावातील 45 वर्षावरील सर्व नागरिकांचे 100 टक्के लसीकरण झाले आहे, आणखी काही गावात जवळपास 80 टक्के आणि 30 ते 40 गावात 50 टक्क्यांहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाल्याची माहिती रौदळ यांनी दिली.
6L53R
शहादा तालुक्यातील पुरुषोत्तम नगर ही जिल्ह्यातील ४५ वर्ष वयावरील शंभरटक्के लसीकरण साधणारी पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.  या ग्रामपंचायतीने ४५ वर्षे वयावरील ३६५ नागरीकांची लसीकरणासाठी नोंदणी केली होती. याशिवाय गावातील १८ ते ४५ दरम्यान वयोगटातील २८८ लाभार्थ्यांची नोंदणी देखील या ग्रामपंचायतीने पुर्ण केली आहे. नंदुरबार तालुक्यातील सिंदगव्हाण आणि नवापुर तालुक्यातील सागळी या दोन्ही गावानीही लसीकरणाबाबत शंभर टक्के उदिष्ट पूर्ण केले आहे. . सिंदगव्हाण गावात ४५ वर्षे वयावरील ४३१ नागरीकांचे लसीकरण पुर्ण झाले आहे.
या तीनही ग्रामपंचायतीच्या लोकप्रतिनिधींपासुन ते लोकसेवक आणि नागरीकांनी लसीकरणाचे ओळखलेले महत्व अधोरेखीत होते. सर्वात महत्वाची बाब म्हणजे या तीनही ग्रामपंचायतीमध्ये आज एकही अॅक्टीव्ह कोरोणा बाधीत रुग्ण नाही आहे. गावात झालेल्या लसीकरणाचा हा शंभर टक्के परिपाक असुन यामुळे हे तीनही गाव कोरोणामुक्त झाल्याचे या गावांच्या ग्रामसेवकानी सांगितले.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेला झाली सुरुवात ; असा करा अर्ज…

Next Post

अखेर कोविडसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंवरील GST दरात कपात

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, ३० ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 29, 2025
Campus 1
इतर

सावधान… या जिल्ह्यात अवकाशातून उपकरणे पडण्याची शक्यता… प्रशासनाने दिली ही माहिती…

ऑक्टोबर 28, 2025
Untitled 39
महत्त्वाच्या बातम्या

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या आर्थिक मदतीबाबत मुख्यमंत्र्यांनी केली ही मोठी घोषणा…

ऑक्टोबर 28, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे ७ निर्णय…

ऑक्टोबर 28, 2025
Next Post
sitaraman

अखेर कोविडसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंवरील GST दरात कपात

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011