नंदुरबार (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी आणि नवीन नावाच्या सातबारा उताऱ्यावर सही शिक्का देण्यासाठी लाच मागणारा लाचखोर तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. तळोदा तालुक्यातील अमलपाडा येथील तलाठी नंदलाल ठाकूर हा ३ हजाराची लाच घेताना रंगेहात सापडला आहे.
या कारवाईबाबत लाचलुचपत प्रतिबंध विभागाने दिलेली माहिती अशी की, एका शेतकऱ्याला त्याच्या जमिनीच्या ७/१२ सातबारा उताऱ्यावर नाव लावायचे होते. त्यासाठी तो तलाठी कार्यालयात आला. नाव लावून देणे तसेच, नवीन नावाच्या सातबारा उताऱ्यावर सही शिक्का देण्याच्या मोबदल्यात लाचखोर तलाठी नंदलाल ठाकूर याने पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती तीन हजार रूपये लाच स्वीकारण्याचे त्याने मान्य केले. त्यानंतर या प्रकरणी एसीबीकडे तक्रार आली. एसीबीने सापळा रचला आणि या सापळ्यात लाचखोर ठाकूर हा रंगेहात सापडला.
यशस्वी सापळा कार्यवाही
लाचखोराचे नाव
नंदलाल प्रभाकर ठाकूर, वय- 44 वर्ष, व्यवसाय- नोकरी , तलाठी, सजा अमलपाडा, तालुका – तळोदा, जिल्हा – नंदूरबार
सापळा अधिकारी
श्रीमती माधवी स. वाघ पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नंदुरबार संपर्क क्र. 8888813731
पर्यवेक्षण अधिकारी:-
श्री.राकेश आ. चौधरी, पो. उपअधीक्षक, ला.प्र.वि. नंदुरबार,मो. नं.9823319220
सह सापळा अधिकारी:-
श्री. समाधान म. वाघ, पोलिस निरीक्षक, ला.प्र.वि., नंदुरबार मो.नं. 8888805100
सापळा कार्यवाही व मदत पथक:-
पोहवा/ विजय ठाकरे, पोहवा/विलास पाटील, पोहवा/ज्योती पाटील, पोना/देवराम गावित, पोना/मनोज अहिरे , पोना/अमोल मराठे व चापोना /जितेंद्र महाले , सर्व नेम. ला.प्र.वि. नंदुरबार.
मार्गदर्शक –
*मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र, नाशिक संपर्क क्र.9371957391
मा. श्री. माधव रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र, नाशिक. संपर्क क्र.9404333049
.श्री. नरेंद्र पवार
वाचक, पोलीस उपअधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय , ला.प्र.वि. नाशिक परिक्षेत्र, नाशिक संपर्क क्र.7977847637
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी अथवा करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक 1064 वर संपर्क साधावा.