नंदुरबार (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ग्रामविकास विभागाच्या ४ ऑक्टोबर च्या अधिसूचनेनुसार नंदुरबार जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापती पदाच्या आरक्षणाचे वाटप उर्वरित कालावधीसाठी विनिर्दिष्ट केले आहे. त्यानुसार पंचायत समितीच्या उर्वरित कालावधीसाठी पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाच्या निवडीसाठी संबंधित पंचायत समितीच्या सभागृहात गुरुवार, १३ ऑक्टोंबर रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष सभेसाठी संबंधित तालुक्याचे तहसिलदार हे पिठासन अधिकारी असतील. तर गट विकास अधिकारी यांना सहायक पिठासीन अधिकारी असतील. तरी सर्व संबंधित सदस्यांनी सभेस उपस्थित राहावे, असे जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी विशेष सभा
ग्रामविकास विभागाच्या ३० सप्टेंबरच्या अधिसूचनेनुसार नंदुरबार जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या आरक्षणाचे वाटप जिल्हा परिषदेच्या उर्वरित कालावधीसाठी विनिर्दिष्ट केले आहे. त्यानुसार नंदुरबार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद हे अनुसूचित जमाती (माहिला) या प्रवर्गासाठी आरक्षित केले आहे. जिल्हा परिषदेच्या उर्वरित कालावधीसाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी जिल्हा परिषदेच्या सभागृहात सोमवार, १७ ऑक्टोंबर रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यासभेकरीता उपजिल्हाधिकारी (महसुल प्रशासन) नितीन सदगीर हे पिठासन अधिकारी असतील. तरी जिल्हा परिषदेमधील सदस्य व पंचायत समितीतील सभापती यांनी विशेष सभेस उपस्थित राहावे, असे जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
Nandurbar Panchayat Samiti and ZP Election