नंदुरबार (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार दुचाकीस्वाराने व त्याच्या मागील सीटवरुन प्रवास करणाऱ्या व्यक्तीने हेल्मेटचा वापर करणे बंधनकारक आहे. असे असतानाही अनेक मोटार सायकल चालक हेल्मेटचा वापर करीत नसल्याचे आढळून आले आहे. दैनंदिन घडणा-या रस्ते अपघातात सर्वाधिक अपघात दुचाकीचे आहेत. हेल्मेट न घाताल्यामुळे मृत्युमुखी पडणान्या दुचाकी स्वारांची संख्या मोठी असून दरवर्षी राज्यात सुमारे ७००० दुचाकी स्वार रस्ते अपघातात मृत्युमुखी पडतात.
दुचाकी स्वारांनी वाहतुकीचे नियम पाळावे व त्यांना हेल्मेटचे महत्व पटावे यासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय नंदुरबार यांच्याव्दारे जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय व खाजगी कार्यालये, शैक्षणिक संस्था, बँका, मॉल्स, हॉटेल्स इत्यादींना हेल्मेट सक्ती बाबत नोटीस बजावण्यात येत असून हेल्मेट न घालणा-या दुचाकी स्वारांना त्यांच्या संस्थेत प्रवेश न देण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
कलम १९४ ड अन्वये विनाहेल्मेट मोटार सायकल चालविणे किंवा चालविण्यास संमती देणे.अशा दोघांवरही जबाबदारी निश्चित करण्यात आलेली असून त्यांना दंडात्मक कारवाईची तरतुद करण्यात आली आहे. एक हजार रुपये दंड व तीन महीने ड्रायव्हींग लायसन्स निलंबित करण्याची तरतूद आहे. तरी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व नागरिकांना तसेच सर्व कार्यालये संस्था यांना विनंती करण्यात येते की त्यांनी आपल्या कार्यालयात / आस्थापनेच्या आवारात विना हेल्मेट दुचाकीवर प्रवेश करणान्यास प्रतिबंध करावा. स्वतःच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्वानी हेल्मेटचा वापर करावा.
Nandurbar Offices Entry Compulsion