नंदुरबार (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात लाचखोरीला ऊत आला आहे. विविध विभागांसह आता वनविभागानेही लाचखोरीत पुढाकार घेतला आहे. या विभागात थोडीथोडकी नव्हे तर तब्बल लाखाची लाच घेतली जात असल्याचे समोर आले आहे. वन गुन्ह्यात जामीन मिळावा म्हणून दोन वन कर्मचाऱ्यांनी तब्बल २ लाखाची लाच मागितली. यातील १ लाखाची लाच घेताना दोन वन कर्मचाऱ्यांसह खासगी एजंट जाळ्यात सापडला आहे.
संजय मोहन पाटील (वय ५४ वर्ष, वनपाल दरा, शहादा), दीपक दिलीप पाटील (वय २७ वर्ष, वनरक्षक, शहादा) आणि नदीम खान पठाण (वय ३७ वर्ष, रा. शहादा) अशी तिन्ही लाचखोरांची नावे आहेत.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीच्या लहान भावावर वन्यजीव संरक्षण अधिनियम अन्वये शहादा वनपरिक्षेत्र कार्यालय येथे गुन्हा दाखल आहे. याच गुन्ह्याअंतर्गत संशयित आरोपीस अटक करण्यात आलेली आहे. दाखल गुन्ह्यात तसेच जामीन मिळण्यास मदत करण्यासाठी खासगी एजंट पठाण याने वनपाल व वनरक्षक यांच्यासाठी तब्बल २ लाख रुपये लाचेची मागणी केली. त्यानंतर तडजोडीअंती ही रक्कम १ लाख रुपये करण्यात आली. ही लाचेची रक्कम स्वीकारण्याचे दोघांनी मान्य केले. वनपाल व वनरक्षक यांनी आरोपी खासगी इसमास प्रोत्साहन दिले. तसेच सरकारी वकीलाकरिता २५ हजार रुपये लाचेची मागणी केली. एसीबीकडे याची तक्रार येताच हा सर्व प्रकार उघड झाला. त्यामुळे याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास एसीबीकडून सुरू आहे.
सापळा अधिकारी
संदीप साळुंखे, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक
सापळा पथक-
पो. हवा .पंकज पळशीकर पो. ना. नितीन कराड, पो. ना प्रभाकर गवळी, पो ना प्रवीण महाजन
मार्गदर्शक
*मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक मो.न. 9371957391
मा .श्री माधव रेड्डी अपर पोलिस अधिक्षक, ला प्र वि नाशिक परिक्षेत्र नाशिक. मो नं 9404333049
श्री. नरेंद्र पवार वाचक, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक. मो.न. 9822627288.
याद्वारे सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने कोणीही त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी, किंवा न करण्यासाठी अथवा ते काम करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नाशिक येथे संपर्क करावा.
दुरध्वनी क्रमांक- 02532578230,
*टोल फ्री क्रमांक १०६४