गुरूवार, सप्टेंबर 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

दोन एकर शेती… तब्बल १० लाखाचे उत्पन्न… नंदुरबारच्या जितेंद्र पाटलांच्या ‘वावरची पॉवर’… जाणून घ्या या अनोख्या प्रयोगाविषयी…

by Gautam Sancheti
एप्रिल 3, 2023 | 5:09 am
in राष्ट्रीय
0
NDR 15 MAR 2023

नंदुरबारच्या जितेंद्र पाटलांच्या
‘वावरची पॉवर’

अवकाळी पाऊस, निसर्गाची अनिश्चितता, नापिकी, वातावरणातील बदल यामुळे पारंपरिक शेती अडचणीत आल्याचे चित्र एकीकडे असताना महाराष्ट्रातल्या नंदुरबारसारख्या दुर्गम भागातील शेतकरी नव्या वाटांवर चालण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून आलं आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या शहादा तालुक्यातील सुलतानपूर येथील शेतकरी जितेंद्र पाटील यांनी असाच एक प्रयोग केला आहे. पावणे दोन एकरात आले शेतीच्या प्रयोगातून लाखोंची कमाई, जितेंद्र पाटलांनी करून एक नवा आदर्श शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे.

महाराष्ट्रातील नंदुरबार सारख्या दुर्गम भागातील शेतकरी नव्या वाटांवर चालण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून आलं आहे. शेतकरी जितेंद्र पाटील यांनी असाच एक प्रयोग केला आहे. पारंपारिक शेतीमध्ये अनेकदा फायदा कमी आणि नुकसान जास्त होते. पांरपारिक शेतीला आधुनिकतेची जोड देत शेतकरी विविध प्रयोग करत असतात. काही शेतकऱ्यांनी तर मिश्र शेतीकडे मोर्चा वळवला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी प्रामुख्याने मिरचीच्या शेतीला प्राधान्य देतात. हा जिल्हा गुजरात आणि मध्य प्रदेश सीमेपासून जवळ असल्यानं शेतकऱ्यांना देखील तेथील बाजारपेठांचा मोठ्या प्रमाणावर फायदा होत असल्याचं दिसून येतं. नंदुरबार जिल्ह्यातील जितेंद्र पाटील या शेतकऱ्यानं आले शेतीतून लाखो रुपयांची कमाई करत शेतीतून शाश्वत उत्पन्नाचा मार्ग शोधलाय. पाटील यांनी दोन एकरात १६ टन आल्याचं उत्पन्न घेतलं आहे. विशेष बाब म्हणजे महाराष्ट्रासह, गुजरात, मध्यप्रदेशच्या व्यापाऱ्यांकडून जागेवरच त्यांच्याकडून चाळीस रुपये प्रति किलोनं हे आले खरेदी केली जात आहे.

शेती हा बिनभरवशाचा व्यवसाय आहे. मात्र, शेतीकडे पाहण्याचा शेतकऱ्यांचा दृष्टिकोन बदलला तर शेतीतूनही चांगल्या प्रकारे उत्पादन मिळू शकते हे जितेंद्र पाटील यांनी दाखवून दिले आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या शहादा तालुक्यातील सुलतानपूर येथील शेतकरी जितेंद्र पाटील यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत त्यांनी आले (अद्रक) शेती करत शेतीतून शाश्वत उत्पन्नाचा मार्ग शोधला आहे.

जितेंद्र पाटील यांच्याकडे एकूण १४ एकर जमीन असून त्यांची काही जमीन त्यांच्या गावाजवळ आहे. गावाजवळ असलेल्या जमिनीत पाळीव,जंगली प्राणी आणि अवकाळी पाऊस, नैसर्गिक आपत्ती, वातावरणातील बदल यासारख्या कारणांनी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असे. त्यामुळे त्यांनी पावणे दोन एकर जमिनीत काही नवीन प्रयोग करण्याचे ठरविले. पाटील यांनी बाजारपेठेचा अंदाज घेत कृषी विभाग व नंदुरबार येथे नव्याने निर्मित शासकीय कृषी महाविद्यालयातील तज्ञांच्या मदतीने आले शेती करण्याचे नियोजन केले.

यासाठी श्री. पाटील यांनी आले बियाणे नाशिक येथून वीस रुपये किलोने खरेदी केले होते. आता त्यांनी आपल्या शेतातून आले काढण्यास सुरुवात केली आहे. मध्य प्रदेश मधील व्यापारी जागेवर चाळीस रुपये किलो दराने त्यांच्याकडून आले खरेदी करत आहेत. पाटील यांनी लागवडीपासून काढणीपर्यंत दोन लाख रुपयांचा खर्च केला आहे. दोन एकरात दहा लाखापर्यंतचं उत्पन्न मिळालं आहे. खर्च वजा जाता आठ लाख रुपये निवळ्ळ नफा राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बाजारपेठेचा अंदाज पाहून शेतीत नवनवीन प्रयोग केल्यास शाश्वत उत्पादनाचा मार्ग खुला होत असतो, असं जितेंद्र पाटील म्हणाले, बाजारपेठेत आले म्हणजेच अद्रकला चांगली मागणी असते, हे लक्षात घेवून पारंपरिक पिकांना फाटा देत जितेंद्र पाटील यांनी शेतकऱ्यांसमोर एक नवीन आदर्श उभा केला आहे.

थोडक्यात महत्वाचे
पारंपारिक शेतीकडून आधुनिक शेतीकडे वाटचाल.
क्षेत्र पावणेदोन एकर, खर्च ₹ २ लाख, उत्पन्न ₹ १० लाख.
कृषी विभाग व शासकीय कृषी महाविद्यालयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन.
महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, गुजरातमधील व्यापाऱ्यांडून जागेवरच खरेदी.
शेतीच्या नव्या प्रयोगातून गवसला शाश्वत शेतीचा मूलमंत्र.

– रणजितसिंह राजपूत (जिल्हा माहिती अधिकारी, नंदुरबार)
Nandurbar Farmer 2 Acre Farm 10 Lakh Production Success Story

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

हाफ आणि फुल तिकीटावरुन एसटीत खडाखडी…. या दोन घटनांमुळे प्रवाशांमध्ये संताप

Next Post

कमी पाण्यात जास्तीच्या उत्पन्नाची हमी देणारी ‘प्रति थेंब अधिक पीक योजना’!

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींसाठी लाभदायक दिवस, अर्थप्राप्ती होईल, जाणून घ्या, शुक्रवार, १२ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 11, 2025
Governance 1 1920x1248 1
संमिश्र वार्ता

‘इज ऑफ लिव्हिंग’ सुधारण्यासाठी राज्य शासनाचे आणखी एक पाऊल पुढे…हे पोर्टल होणार कार्यान्वित

सप्टेंबर 11, 2025
IMG 20250911 WA0337 1
स्थानिक बातम्या

हाय्रॉक्स मुंबई आंतरराष्ट्रीय स्पर्धेत नाशिकच्या स्ट्राईकिंग स्ट्रायडर्सचा चमकदार विजय

सप्टेंबर 11, 2025
image005V4IZ
संमिश्र वार्ता

सेनादलांतील या दहा महिला अधिकारी नऊ महिन्यांत २६ हजार सागरी मैलांचा प्रवास पूर्ण करणार…

सप्टेंबर 11, 2025
HYRYDER LE car 1 1
संमिश्र वार्ता

टोयोटा किर्लोस्‍कर मोटरकडून नवरात्री निमित्त ही ऑफर…१ लाख रूपयांहून अधिक फायदा

सप्टेंबर 11, 2025
ASHTAVINAYAK 2 1024x682 1
राज्य

अष्टविनायक विकास आराखडा….उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले हे निर्देश

सप्टेंबर 11, 2025
crime 88
क्राईम डायरी

नाशिकमध्ये वेगवेगळया भागात चार घरफोड्या…तीन लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

सप्टेंबर 11, 2025
Untitled 11
संमिश्र वार्ता

धक्कादायक….महसूल अधिकाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी रेती माफियांकडून ड्रोनचा वापर

सप्टेंबर 11, 2025
Next Post
rice cultivation farm

कमी पाण्यात जास्तीच्या उत्पन्नाची हमी देणारी ‘प्रति थेंब अधिक पीक योजना’!

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011