नंदुरबार (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या महिनाभरापासून राज्यभरात अवकाळी पावसामुळे शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. द्राक्ष, गहू आणि संत्री बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. एकीकडे अवकाळीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे आता नुकसान भरपाई कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. त्याचवेळी पावसाने पुन्हा कहर केला असून नंदुरबार जिल्ह्यात नदी नाल्यांना चक्क पूर आला आहे. कडाक्याच्या उन्हात नदीला पूर आल्याने ही बाब आश्चर्याची ठरत आहे.
नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअस पार गेला असून मात्र कडाक्याच्या उन्हाळ्यातही अवकाळी पावसामुळे तळोदा तालुक्यातील रापापुर येथील नदीला पूर आला असून नदी दुथडी भरून वाहत आहे. आज दुपारपासून नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा धडगाव अक्कलकुवा आणि शहादा तालुक्यातील अनेक भागात जोरदार अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे.
गेल्या दोन, तीन आठवड्याभरापासून राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. सातपुडा पर्वत रांगेतील अनेक नद्यांना पूर आला असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
खरे म्हणजे अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळाले आहे. राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने द्राक्ष, हरभरा, गहू या पिकांसह मिरची, कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगेतील अनेक नद्यांना या अवकाळी पावसामुळे पूर आला आहे. धडगाव, अक्कलकुवा, शहादा तालुक्यातील अनेक नद्यांना पूर आला आहे.
पावसाळ्यात जसा नद्यांना पूर येतो, तसा या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. नदीकाठच्या वस्ती गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस झाल्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे चित्र आहे. चक्क उन्हाळ्यात नदीला पूर आल्याने नागरिकांनी नदीचे पाणी पाहण्यासाठी गर्दी केली होती. अवकाळी पाऊस व गारपोटीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरकारने अगोदरच झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले आहेत. मात्र मदतीसंदर्भात अजूनही कारवाई झालेली नाही.
दरम्यान, विदर्भात नागपूर शहरात आज पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली.दोन दिवसांपूर्वी आलेल्या वादळी पावसामुळे नागपूर शहरात अनेक झाडे कोसळली होती. तर शहरात अनेक भागात वीज पुरवठा खंडित होता.आजही काही भागात पावसासह गारपीट देखील झाली आहे.
नंदुरबार जिल्ह्यात चक्क उन्हाळ्यात नदीला पूर pic.twitter.com/0ZWSEjBfzX
— Ruchika (@Ruchika66964659) April 22, 2023
Nandurbar District River Flood in Summer Season