नंदुरबार (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ढेकवद ते नंदूरबार मार्गावरील रेल्वे गेट नंबर 88 कि.मी.154/02-04 या मार्गावरील वाहतूक 2 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारी या काळात बंद राहणार आहे. रेल्वे लाईन दुरुस्तीच्या कामासाठी 2 फेब्रुवारी सकाळी 8 पासून ते 5 फेब्रुवारी सांयकाळी 7-00 वाजेपर्यंत बंद करण्यात येणार असल्याचे अपर जिल्हादंडाधिकारी सुधीर खांदे यांनी कळविले आहे.
या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार असल्याने सदर कालावधीत काही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणार नाही, यासाठी पोलीस विभागाने रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधुन यामार्गावरील वाहतूक वळविण्याबाबत कार्यवाही करावी. असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
Nandurbar District Railway Crossing Traffic Closed