बुधवार, जुलै 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नंदुरबार जिल्ह्यातील या शेतकऱ्यांना मिळाला ट्रॅक्टर; पालकमंत्र्यांच्या हस्ते वाटप

by Gautam Sancheti
मे 8, 2023 | 5:15 pm
in स्थानिक बातम्या
0
Dio News Photo 3 May 2023 21 scaled e1683546312897

 

नंदुरबार (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – यंदा कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तसेच अवकाळी पावसाच्या पार्श्वभुमीवर बियाण्यांची गुणवत्ता व पेरणीयोग्य कालावधी समजावून सांगण्यासाठी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्याचे निर्देश राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदूरबारचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिले आहेत.

ते आज जिल्ह्याच्या 2023 च्या खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कार्यालयातील बिरसा मुंडा सभागृहात मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, उपाध्यक्ष सुहास नाईक, जिल्हाधिकारी मनिषा खत्री, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, सहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्की, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राकेश वाणी तसेच कृषीसह विविध यंत्रणांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री डॉ. गावित म्हणाले, नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रीयकृत, खाजगी, स्थानिक ग्रामीण बॅंका यांनी दिलेल्या लक्षांकाप्रमाणे कर्ज वितरण करणे अपेक्षित आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतील ठिबक सिंचनाबाबत शेतकऱ्यांमध्ये व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात यावी. नॅनो युरियाच्या वापर करून पिकांच्या वाढीसाठी आवश्यक नायट्रोजनची गरज लक्षात घेवून पिकांच्या खतांची गरज पूर्ण करता येते. त्यामुळे युरिया खताची बचत करून जमिनीवर विपरीत परिणाम न होवू देता इतर सरळ व मिश्र खतांचा वापर वाढविता येतो, त्यामुळे उत्पादनात भरघोस वाढ झाल्याची उदाहरणे असल्याचे सांगून डॉ. गावित यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेत ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा घेतला आहे, अशा शेतकऱ्यांना पिकांच्या कापणी प्रयोगाच्या आधारावर मिळणारी पिक विम्याची रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

अवकाळी पावसामुळे व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून सुमारे 8 कोटी 56 लाख 87 हजार इतका निधी शासनाकडून मंजूर झाला असून तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तात्काळ वितरित करण्याच्या सूचनाही यावेळी डॉ. गावित यांनी केल्या आहेत.

या विषयांचा घेतला आढावा
बैठकीत मागील बैठकीतील सूचनांचे अनुपालन, जिल्ह्याची सर्वसाधारण भौगोलिक परिस्थिती, मागील पाच वर्षातील जिल्ह्यातील तालुका व महिनानिहाय पर्जन्यमान, मागील वर्षातील कृषी उत्पन्न बियाण्यांची प्रत्यक्ष उपलब्धता व चालू खरीप हंगामासाठीचे नियोजन, खत पुरवठा, कीटक नाशके व औजारे, गुणवत्ता नियंत्रण, कृषी विभागामार्फत राबविण्यात आलेल्या महत्वाच्या योजना, प्रधानमंत्री पिक विमा योजना, गोपिनाथ मुंडे अपघात विमा योजना, मुलस्थानी जलसंधारण, बिजप्रक्रिया, मिश्रपिक पद्धती, व इतर तंत्रज्ञान, संभाव्य पर्जन्यमानासंदर्भात करावयाच्या उपाययोजना, नैसर्गिक आपत्ती, चारा उपलब्धता, सहकारी संस्था, कृषी पतपुरवठा, कृषी पंपांसाठी विज जोडणी व डिझेल नियोजन पाणी वापर संस्थांची सद्यस्थिती या विषयांचा आढावा घेण्यात आला. यावेळी झालेल्या चर्चेत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, उपाध्यक्ष सुहास नाईक, जिल्हाधिकारी मनिषा खत्री, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, सहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्की, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राकेश वाणी यांनी सहभाग घेतला.

राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा सन्मान
या बैठकीसाठी राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त 4 शेतकऱ्यांना निमंत्रीत करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री डॉ. गावित यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांचे तपशील पुढीलप्रमाणे…
रोहिदास विजय पाडवी, धनपूर ता. तळोदा ( उडीद पिक)
दशरथ राज्या वळवी, भादवड ता. नवापूर (मका पिक)
दिलीप भामट्या भील, बामखेडा ता. शहादा (तूरपिक)
सखाराम कैस गावित, खोकसा ता. नवापूर (उडीद पिक )

बियाणे वाटपाचा शुभारंभ
यावेळी खरीप हंगाम 2023 च्या विविध प्रकल्पातील बियाणे वाटपांचा शुभारंभ पालकमंत्री डॉ. गावित यांच्या हस्ते 6 शेतकऱ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात बियाणे वितरित करून करण्यात आला. त्याचा तपशील पुढील प्रमाणे…
शशिपाल सुपडू गावित, टोकरतलाव ता. नंदुरबार (तूर)
संजय नामदास ठाकरे, भुलाणे ता. शहादा (तूर)
बोखा खायला वसावे, माळ खु.ता. तळोदा (तूर)
जामसिंग शिवण्या पावरा, बिजरी ता. अक्राणी (तूर)
सुरेश वाडग्या कोकणी, पळसून ता. नवापूर (भात)
कृष्णा भरत पवार, मोरंबा ता. अक्कलकुवा (भात)

या पुस्तिकांचे झाले प्रकाशन
यावेळी विविध विस्तार योजनेतील पौष्टिक तृणधान्य आरोग्याची शिदोरी व बाजरी पदार्थाचा उद्योग या दोन पुस्तिकांचे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले.

ट्रॅक्टर वाटप
यावेळी राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेत ‘महाडिबीटी’ पार्टलवर कृषी आयुक्तालयामार्फत काढण्यात आलेल्या लकी ड्रॉ मध्ये जिल्ह्यातील या दोन लाभार्थ्यांना अनुक्रमे मोठ्या व मिनी ट्रॅक्टरचे वितरण यावेळी करण्यात आले. त्याचा तपशील पुढील प्रमाणे…
द्वारकीबाई हरकलाल कोकणी, रनाळे खु. ता.जि. नंदुरबार (मोठा ट्रॅक्टर)
विनोद तुकाराम पाटील, कोळदा ता.जि. नंदुरबार (मिनी ट्रॅक्टर)

Nandurbar District Farmer Tractor Scheme Government

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

तयार रहा! आता जीमेलसाठीही मोजावे लागणार पैसे

Next Post

सांगूनही उद्धव ठाकरेंनी ऐकलं नाही… असं काय घडलं.. नाना पटोलेंनी सगळं सांगून टाकलं…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
FvdjJJyaEAEeRXK e1683546830144

सांगूनही उद्धव ठाकरेंनी ऐकलं नाही... असं काय घडलं.. नाना पटोलेंनी सगळं सांगून टाकलं...

ताज्या बातम्या

Pne Photo Chandrakant Dada Patil Adhawa Baithak 13 Jane 2025 2 1920x1280 1

सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ…

जुलै 9, 2025
सरन्यायाधीश भूषण गवई यांचा विधीमंडळात गौरव 3 1024x683 1

सरन्यायाधीश भूषण गवई यांचा राज्याच्या विधिमंडळात असा झाला गौरव…

जुलै 9, 2025
JIO1

महाराष्ट्रामध्ये जीओ अव्वल; मे महिन्यात महाराष्ट्रात इतक्या लाख नवीन ग्राहकांची नोंद

जुलै 9, 2025
nashik

नाशिक महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचा-यांचा वेतन प्रश्नावर विधासभेत लक्षवेधी…दोषी अधिका-यावर होणार कारवाई

जुलै 9, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषदेतील एका अधिकाऱ्याकडून २० हून अधिक महिलांचा लैंगिक मानसिक छळ

जुलै 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी प्रयत्नांमध्ये काटकसर करू नये, जाणून घ्या, बुधवार, ९ जुलैचे राशिभविष्य

जुलै 8, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011