नंदुरबार (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्हाधिकाऱ्यांनी आठवडे बाजाराबाबत आज महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील 18, अक्कलकुवा तालुका 31, अक्राणी तालुका 47, तळोदा तालुका 1, शहादा तालुका 10, नवापूर तालुक्यातील 16 अशा एकूण 123 ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीसाठी रविवार 18 डिसेंबर, 2022 रोजी मतदान तर मंगळवार 20 डिसेंबर,2022 रोजी मतमोजणी होणार आहे.
त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील ज्या गावांत ग्रामपंचायत निवडणूका असतील त्या मतदार क्षेत्रात रविवार 18 डिसेंबर,2022 रोजी मतदानाच्या दिवशी तसेच मंगळवार 20 डिसेंबर, 2022 रोजी मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी केंद्राच्या परिसरात भरणारे आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले आहेत. या दिवशी भरविण्यात येणारे आठवडे बाजार अन्य दिवशी भरविण्यात यावे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
Nandurbar District Athavade Bajar Closed