नंदुरबार (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, नंदुरबार अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्षाला नगाव ता. जि.नंदुरबार येथील अल्पवयीन मुलीचा विवाह नंदुरबार जिल्ह्यातील मु.होळ तर्फे रनाळे ता. जि. नंदुरबार येथील अल्पवयीन मुलाशी होणार असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाल्याने सदर बालविवाह थांबविण्यात आला असल्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, नंदुरबार रा.वा. बिरारी यांनी कळविले आहे.
जिल्हा बाल संरक्षण कक्ष, नंदुरबार यांनी शुक्रवार 19 मे 2023 रोजी होणारा बालविवाह प्रत्यक्ष संबंधीत पालकांची भेट घेऊन कार्यालयामार्फत बालविवाह संदर्भात नोटीस देऊन तसेच बालविवाहाचे दुष्परिणाम व वालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 याबाबत सविस्तर माहिती देऊन विहित नमुन्यातील हमीपत्र घेवून सदर बालविवाह थांबविण्यात आला.
यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, रा.वा. बिरारी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, यु. पो. पाडवी पोलीस विभागाचे गौतम वाघ, बाल संरक्षण अधिकारी गौरव पाटील, जिल्हा बाल संरक्षण कक्ष समुपदेशक तसेच गावातील ग्राम बाल संरक्षण समिती, सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील, अंगणवाडी ताई आदी यावेळी उपस्थित होते.
Nandurbar Child Wedding Administration Efforts