नंदुरबार (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार माहे ऑक्टोंबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती, नव्याने स्थापित तसेच समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसल्यामुळे मागील निवडणूकांमधून वगळलेल्या ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील 18, अक्कलकुवा 31, अक्राणी-47, तळोदा-1, शहादा-10 व नवापूर 16 अशा एकूण 123 ग्रामपंचायतींचा निवडणुक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
ग्रामपंचायतीसाठी निवडणूक कार्यक्रम असा राहील. तहसिलदार शुक्रवार 18 नोव्हेंबर 2022 रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिध्द करतील, नमुना ‘अ’ अ मध्ये नमूद ठिकाणी 28 नोव्हेंबर 2022 (सोमवार) ते 2 डिसेंबर 2022 (शुक्रवार) रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागविता व सादर करता येतील.
सोमवार 5 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजेपासून नामनिर्देशनपत्र छाननी करण्यात येईल. बुधवार 7 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशपत्र मागे घेता येईल. बुधवार 7 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजेनंतर निवडणूक चिन्ह नेमून देण्यात येतील. तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येईल.
रविवार 18 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5 .30 वाजेपर्यंत मतदान होईल, तर मंगळवार 20 डिसेंबर 2022 रोजी (मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्येतेने तहसीलदार निश्चित करतील त्यानुसार राहील ) मतमोजणी होणार असून निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना शुक्रवार 23 डिसेंबर 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल.
जिल्ह्यात निवडणूका होत असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहिर केल्यापासून निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहील.असे उपजिल्हाधिकारी नितीन सदगीर (महसूल प्रशासन) यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.
Nandurbar 123 Grampanchayat election Declare