नांदूरमध्यमेश्वरच्या ‘त्या’ जागेच्या प्रकरणात खळबळजनक बाब समोर…
तहसिलदारांसह उपअधिक्षकांचे काय होणार?
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नांदूर मध्यमेश्वर गावातील मध्यवर्ती ठिकाणी असलेली सि.सि.नं. 505 क्षेत्रफळ 55 गुंठे जमीन जामा मस्जिद ट्रस्ट या नावाने बेकायदेशीपणे वर्ग करण्यात आली आहे. या गंभीर गैरप्रकारात तहसीलदार विशाल नाईकवाडे, उपअधिक्षक भूमी अभिलेख राजेंद्र भाबड यांचा थेट सहभाग असुन या अधिकाऱ्यांनी ही जमीन बेकायदेशीरपणे मिळवून देण्यासाठी कटकारस्थान रचले आहे. त्याअनुषंगाने निफाड तहसिल कार्यालय येथे 15 ऑक्टोबर 2025 रोजी भव्य ठिय्या आंदोलन होणार असल्याने या विषयास अनुसरून निफाड तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी पुढीलप्रमाणे स्पष्टीकरण प्रसिद्धीसाठी पत्रकान्वये दिले आहे.
1.जामा मस्जिद ट्रस्ट (समस्त मुस्लिम समाज नांदूर मध्यमेश्वर) यांचे तर्फे मुसाभाई बाबुभाई मुलानी व इतर यांनी “कब्रस्तान” या सार्वजनिक प्रयोजनासाठी मौजे, नांदूर मध्यमेश्वर ता. निफाड जि. नाशिक येथील सि.स.नं. ५०५ क्षेत्र ५४८६.५० चौ.मी. एवढे क्षेत्र हस्तांतरीत करण्याची विनंती केली होती.
२. मा. अवर सचिव, महाराष्ट्र राज्य यांचेकडील शासन ज्ञापन क्र. जमीन-३०२३/७३४/प्र.क्र. ३२९/ण-६ दिनांक. १५ मार्च २०२४ अन्वये ग्रामपंचायत नांदुर मध्यमेश्वर ता. निफाड जि. नाशिक यांना मुस्लिम समाजाच्या “कब्रस्तान” या सार्वजनिक प्रयोजनाकरिता मौजे. नांदुर मध्यमेश्वर ता. निफाड जि. नाशिक येथील सि.स.नं. ५०५ क्षेत्र ५४८६.५० चौ.मी. एवढी शासकीय जमीन महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट लावणे) नियम १९७१ चे नियम ५ व ६ नुसार भोगाधिकार मुल्यरहित व महसुलमुक्त किमतीने शासनाची मान्यता देण्यात आलेली आहे.
३. मा. अपर जिल्हाधिकारी नाशिक यांचेकडील आदेश क्र. मह/कक्ष.३/९/कावि/ई- १७३६९२३/३५८/२०२४ दि. ०८.०७.२०२४ अन्वये महाराष्ट्र शासनाचे ज्ञापनान्वये महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट लावणे) नियम १९७१ चे नियम ५ व ६ मधील तरतुदीनुसार मौजे. नांदुर मध्यमेश्वर ता. निफाड जि. नाशिक येथील सि.स.नं. ५०५ क्षेत्र ५४८६.५० चौ. मी. हो शासकीय जागा भोगाधिकार मुल्यरहित व महसुलमुक्त किमतीने अटी व शर्तों क्र. १ ते १६ चे अधिन राहून मुस्लिम समाजाच्या “कब्रस्तान” या सार्वजनिक प्रयोजनार्थ वितरीत करण्यात आलेलो आहे.
४. त्यानुसार, मा. अवर सचिव, महाराष्ट्र राज्य यांचेकडील शासन ज्ञापन क्र. जमीन-३०२३/७३४/प्र.क्र. ३२९/ज.६ दिनांक. १५ मार्च २०२४ व मा. अपर जिल्हाधिकारी नाशिक यांचेकडील आदेश क्र. मह/कक्ष. ३/९/काधि/ई- १७३६९२३/३५८/२०२४ दि. ०८.०७.२०२४ अन्वये निर्गमित करणेत आलेल्या आदेशाची या कार्यालयाकडून केवळ अंमलबजावणी करण्यात आली असल्याचेही तहसीलदार श्री. नाईकवाडे यांनी कळविले आहे.