शुक्रवार, ऑगस्ट 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नांदगाव विधानसभा मतदार संघात कांदे, भुजबळ, धात्रक नंतर डॅा. रोहन बोरसे यांचे नाव सध्या जास्त चर्चेत

by Gautam Sancheti
ऑक्टोबर 31, 2024 | 11:13 am
in संमिश्र वार्ता
0
Screenshot 20241031 103458 Collage Maker GridArt

गौतम संचेती, नाशिक
नांदगाव विधानसभा मतदार संघात नामनिर्देशनपत्र छाननी नंतर एकुण ३२ उमेदवार रिंगणात असले तरी त्यातील सर्वात चर्चेचे नाव आता डॅा. रोहन बोरसे यांचे ठरले आहे. जिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ञ व वैद्यकिय अधिकारी असलेले डॅा. रोहन बोरसे यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे राजीनामा दिल्यानंतर आता ते थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. त्यांचे नाव चर्चेत येण्याचे कारणही तसेच आहे. डॅा. बोरसे हे २०१८ ते २०२२ या दरम्यान नांदगाव आरोग्य केंद्रात वैद्यकिय अधिकारी होते. या कोरोना काळात त्यांची कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे. त्यांनी केलेली रुग्णसेवा अनेकांच्या आजही लक्षात आहे. त्यामुळे त्यांची देवदूत अशी प्रतिमा तयार झाली आहे.

नांदगाव तालुक्यातील साकोरा या गावातील रहिवासी असलेले डॅा. बोरसे हे मराठा समाजाचे आहे. नांदगाव मतदार संघात चर्चेत असलेले शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे, अपक्ष माजी खासदार समीर भुजबळ व ठाकरे गटाचे उमेदवार गणेश धात्रक हे तिन्ही उमेदवार हे ओबीसी समाजाचे आहे. त्यामुळे येथे मराठा समाजाचा सक्षम उमेदवार असावा अशी मागणी होती. त्यामुळे त्यांनी थेट आपल्या पदाचा राजीनामा दिला.

राजीनामा मंजूरीसाठी थेट न्यायालयात
हा राजीनामा दिल्यानंतर सत्ताधारी पक्षही सावध झाले. त्यांनी हा राजीनामा मंजूर होऊ नये यासाठी जोरदार प्रयत्न केले. अगोदर जिल्हा स्तरावर त्यांचा मंजुरी देण्यास टाळाटाळ करण्यात आली. पण, ग्रामस्थांच्या दबावानंतर तो मंजूर करण्यात आला. त्यानंतर मंत्रालयातून तो मंजूर झाला नाही. शेवटी त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर सुनावणी झाली. त्यानंतर राज्य सरकारने राजीनामा मंजूर करीत असल्याचे लेखी आदेश काढले व नामनिर्देशपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी डॅा. रोहन बोरसे यांनी अर्ज दाखल केला. आता छाननीत तो वैध ठरला आहे.

असे आहे समीकरण
नांदगाव विधानसभा मतदार संघात गेल्या तीन विधानसभा निवडणुकीत ओबीसी समाजाचा आमदार झालेला आहे. त्यात दोन वेळेस पंकज भुजबळ व आता विद्यमान आमदार सुहास कांदे यांचा समावेश आहे. त्यामुळे आता ही संधी मराठा समाजाला मिळावी अशी भावना येथे प्रबळ आहे. या मतदार संघात सर्वात जास्त मते ही मराठा समाजाची आहे. त्या खालोखाल वंजारी, धनगर, माळी, अनुसूचित जाती, जमाती, बौध्द, मुस्लिम मते आहेत. सध्या राज्यभर मराठा आंदोलनामुळे मराठा समाज जागृत झालेला आहे. त्यामुळे मराठा समाजाने डॅा. रोहन बोरसे यांच्या पारड्यात जास्त मते टाकली तर येथील समीकरण बदलू शकते. डॅा.बोरसे यांच्या प्रतिमेमुळे त्यांना इतर समाजाची मते पडू शकतात. त्यामुळे डॅा. रोहन बोरसे यांचे नाव आता जास्त चर्चेत आले आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इगतपुरी विधानसभा मतदार संघात २८ उमेदवार रिंगणात…नामनिर्देशनपत्र छाननी झाल्यानंतर वैध उमेदवारांची यादी बघा फोटोसह

Next Post

नामनिर्देशनपत्र छाननीनंतर २८७ मतदारसंघात ७ हजार ५० उमेदवारांचे अर्ज वैध…एका मतदार संघाची छाननी लांबणीवर

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
election6 1140x571 1

नामनिर्देशनपत्र छाननीनंतर २८७ मतदारसंघात ७ हजार ५० उमेदवारांचे अर्ज वैध…एका मतदार संघाची छाननी लांबणीवर

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011