नांदगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नांदगाव विधानसभा मतदार संघात शिवसेना ठाकरे गटाचा निष्ठावंत, कडवट शिवसैनिक संतोष बळीद यांनी शड्डू ठोकला आहे. नांदगामध्ये दहशत मोडत गद्दारांना धडा शिकवण्यासाठी त्यांनी गेल्या काही दिवसांपासून मुक्काम ठोकला आहे.
नांदगाव तालुकाप्रमुख संतोष गुप्ता यांना अंमली पदार्थ ठेवल्याच्या बनावट प्रकरणात अटक केल्यानंतर येथील शिवसैनिकांमध्ये जोष भरला आहे. संतोष बळीद महाविकास आघाडीतील ठाकरे गटाचे उमेदवार गणेश धात्रक यांच्या प्रचाराचासाठी रणागणांत उतरले आहे. त्यांनी शहरातील सर्व भाग गुप्ता कुटुंबिय व शिवसैनिकांबरोबर पिंजून काढत प्रचार सुरु केला असून त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
शिवसेनेत फुट पडल्यानंतर आमदार सुहास कांदे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर निष्ठांवत शिवसैनिकांनी ठाकरे यांना साथ दिली. त्यात संतोष बळीद यांचाही समावेश आहे. संतोष बळीद लहानपणापासून शिवसैनिक म्हणून काम करत आहे. माजी आमदार राजाभाऊ देशमुख यांचे सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे. शहरी भागाप्रमाणेच त्यांची ग्रामीण भागात चांगली पकड आहे. धाडसी व आक्रमक स्वभाव असलेल्या संतोष बळीद यांनी मनमाड नगर पालिकेत दोन वेळेस नगरसेवक व विविध पदे भूषविली आहे.नागरिकांच्या समस्या घेऊन रस्त्यावर आंदोलन करणारा कडवट शिवसैनिक म्हणून ते नेहमी चर्चेत असतात. त्यांच्या नांदगाव मुक्कामुळे शिवसेनेशी फारकत घेऊन गद्दारी करणा-यांना चांगलीच धडकी भरली आहे.
निष्ठावंत शिवसैनिकांची फौज
नांदगाव तालुकाप्रमुख संतोष गुप्ता यांचे बंधु गुड्डु गुप्ता, नांदगाव शहर प्रमुख श्रावण आढाव, भूषण थोरवे, रोहन शिंदे, अवी निळे, सन्नी करकाळे, राजू करकाळे, अनेक सहकारी व निष्ठावंत शिवसैनिकांची फौजही बळीद यांच्याबरोबर प्रचार करत आहे.