नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नांदगाव पोलिस स्टेशनचे दोन पोलिस लाच घेताना पकडले गेले आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रचलेल्या सापळ्यात अडकले आहेत. हे दोघे जण तब्बल ३५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ सापडले आहेत. पोलिस हवालदार सुरेश पंडित सांगळे आणि पोलिस शिपाई अभिजीत कचरु उगलमुगले अशी लाचखोर पोलिसांची नावे आहेत.
नांदगाव पोलिस स्टेशनमध्ये जमा असलेला ट्रॅक्टर सोडविण्यासाठी या दोघांनी तब्बल ३५ हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर याप्रकरणी एसीबीकडे तक्रार करण्यात आली. एसीबीच्या पथकाने सापळा रचला. अखेर सांगळे आणि उगलमुगले या दोघांनी ३५ हजार रुपयांची लाच स्विकारली. एसीबीच्या पथकाने या प्रकरणी दोघा पोलिसांवर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास एसीबी करीत आहे.
दरम्यान, लाच देणे आणि घेणे गुन्हा आहे. यासंदर्भात तक्रार करण्यासाठी एसीबीच्या १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Nandgaon Police ACB Trap Corruption Bribe