गुरूवार, नोव्हेंबर 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

समीर भुजबळ यांच्या भव्य रॅलीने वेधले सर्वांचे लक्ष…चौकाचौकात जेसीबीद्वारे पुष्पवृष्टी

नोव्हेंबर 18, 2024 | 6:16 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20241118 WA0272

मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– ढोल ताशाचा गजर, शेकडोच्या संख्येने तरुण महिला आणि प्रौढ,सर्वत्र शिट्टीमय वातावरण,संथ गतीने पुढे जाणारा जमाव… अशा प्रसन्न वातावरणात अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांची भव्य प्रचार रॅली आज शहरात संपन्न झाली.या रॅलीमुळे मतदारांचा कौल भयमुक्त नांदगावकडे असल्याने समीर भुजबळ यांचा विजय निश्चित मानला जात आहे.दरम्यान,या भव्य रॅलीची चर्चा संपूर्ण मतदारसंघात होत आहे.

एकात्मता चौकात रॅलीचे रुपांतर जाहीर सभेत झाले. यावेळी समीर भुजबळ म्हणाले की, नांदगावमधील दहशत आपल्याला गाडायची आहे. गुंडगिरी, दादागिरीमुळे विकास कामे कुठेच झालेली नाहीत. शेजारच्या येवला मतदारसंघाचा कायापालट हे देशभरात चर्चेचे ठरत आहे. आपल्याला तसाच विकास घडवायचा आहे. विकासाचा भुजबळ पॅटर्न आपल्याला राबवायचा आहे. पार गोदावरी प्रकल्प राबवून खिरडीसाठे येथील पाणी लोहशिंगवे धरणात टाकले जाणार आहे. तेथून भालूर, लक्ष्मीनगर, मांडवड, सोयगाव, वडाळी, मोरझर, बाणगाव खिरडी, भवरी, टाकळी, तांदुळवाडी, दहेगाव, नांदगाव, माणिकपुंज धरण आदी भाग आपल्याला जलमय करायचा आहे. दुष्काळ कायमस्वरूपी संपवायचा आहे. या विराट जनसमुदायाची उपस्थितीच सांगते आहे की परिवर्तन होणार आहे. आपण सर्वांनी मला आशीर्वाद दिले आहेत असे मी समजतो. आपल्या सर्वांना मतदानाच्या दिवशी माझ्यासाठी केवळ अर्धा तास द्यायचा आहे. त्यानंतर पुढची पाच वर्षे मी आपल्यासाठी अहोरात्र काम करणार आहे, असा शब्द भुजबळ यांनी यावेळी सर्वांना दिला.

यावेळी आरपीआयचे नेते प्रकाश लोंढे म्हणाले की, ‘नही चलेगी, नही चलेगी, दादागिरी नही चलेगी’. मनमाडची पाण्याची समस्या आणि तालुक्यातील असंख्य प्रश्न सोडवायचे असेल तर समीर भुजबळ यांच्याशिवाय पर्याय नाही. भुजबळ विजयी होताच नांदगाव भयमुक्त होईल, यात कुठलीही शंका नाही. येथे उपस्थित प्रचंड जनसमुदायाच भुजबळांच्या विजयाची नांदी आहे. ९ क्रमांकाच्या शिट्टी निशाणीवर मत देऊन भुजबळ यांना प्रचंड मतांनी विजयी करावे.”, असे नम्र आवाहन त्यांनी केले.

माजी खासदार समीर भुजबळ यांनी महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.त्यानंतर विराट प्रचार रॅलीला प्रारंभ झाला. यामुळे संपूर्ण मनमाड दुमदुमून गेले. प्रचार रथावर भुजबळ यांच्यासह रिपाइ नेते प्रकाश लोंढे, मुफ्ती मौलाना हश्मतुल्ला, मुस्लीम वोटर कौन्सलरचे कन्वीनर अब्दुल बारी खान, रेड क्रेसेंटचे चेअरमन अर्शद सिद्धिकी, ऑल इंडिया ओलोमा बोर्डचे अध्यक्ष बुनई अल हस्नी, दीपक गोगड, विजय पाटील, रवींद्र घोडेस्वार, कैलास अहिरे, दिलीप नरवडे, पंकज शेवाळे, कैलास अहिरे, संजय निकम, पी आर निळे, संजय निरभवणे, रतन हलवर, विनोद शेलार, आप्पा कुनगर आदी मान्यवर उपस्थित होते. तर रॅलीमध्ये योगिता पाटील, अपर्णा देशमुख, मीनाक्षी काकळीज, कविता कर्डक आदी महिला सहभागी झाल्या.

IMG 20241118 WA0253

समीर भुजबळ यांना पाठींबा जाहीर
लोक जनशक्ती पार्टी,स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी,माजी नगरसेवक स्वर्गीय रफिकभाई शेख मित्र मंडळ, रेल्वे स्टेशन काळी पिवळी टॅक्सी संघटना यांच्यासह नूतन पगारे व विलास कटारे यांनी समीर भुजबळ यांना पाठिंबा दिला.तशी घोषणा यावेळी करण्यात आली.

रॅलीचा मार्ग
रॅलीची सुरुवात मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून झाली.त्यानंतर ही रॅली मालेगाव चौफुली इथून पकिजा कॉर्नर मार्गे नगिना मस्जिद येथून तुफान चौकात आली. त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून रॅली एकात्मता चौकात आली.याठिकाणी रॅलीचे रुपांतर जाहीर सभेत झाले.

रॅलीची क्षणचित्रे

  • अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांनी शिट्टी निशाणी असलेली टोपी, उपरणे परिधान केले तर त्यांच्या गळ्यातही शिट्टी होती.
  • डॉ. शेफाली भुजबळ यांनी रॅलीचे नेतृत्व केले तर शेकडोच्या संख्येने महिलांचा रॅलीत सहभागी झाल्या.
  • रॅलीमार्गात काही महिलांनी काढली शिट्टी निशाणीची रांगोळी.
  • रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांची रॅली पाहण्यासाठी आणि भुजबळ यांचे स्वागत करण्यासाठी गर्दी.
  • ‘आमचे मत शिट्टीलाच’,‘समीर भुजबळ तुम आगे बढो’, ‘भयमुक्त नांदगाव आता होणारच’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमला .
  • रॅलीचे पहिले टोक नगीना मस्जिद येथे तर शेवटचे टोक थेट बाजार समिती जवळ होते.
  • ॲम्बुलन्स सायरन वाजवत येताच रॅलीतील माता-भगिनींनी वाट मोकळी करून दिली.
  • चौकाचौकात जेसीबीद्वारे समीर भुजबळ यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात येत होती.
  • रॅलीत निळे भगवे हिरवे पिवळे सर्व प्रकारचे झेंडे दिसत होते.
  • ढोल-ताशांचा गजरात कार्यकर्त्यांनी तालावर ठेका धरला.
  • रॅलीतील कार्यकर्त्यांमध्ये अपूर्व उत्साह दिसत होता.
  • रॅलीमार्गात शिट्टी वाजवून निशाणीचा जोरदार प्रचार.
  • कार्यकर्त्यांच्या डोक्यावर आकर्षक टोप्या. त्यावर समीर भुजबळ यांचा फोटो, नाव, शिट्टी निशाणी.
  • शिट्टी निशाणी आणि समीर भुजबळ यांचे नाव व फोटो असलेले उपरणे अनेकांच्या गळ्यात.
  • लहानग्यांपासून वृद्धांपर्यंत सर्वच उत्साहाने सक्रीय.
  • बहुसंख्य शहरवासियांच्या हातात समीर भुजबळ यांचा वचननामा.
  • जवळपास सर्वांच्याच गळ्यात शिट्टी.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

शेजारी राहणा-या महिलेचा विनयभंग…चेतनानगर भागातील घटना

Next Post

नाशिक जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघातील जाहीर प्रचाराची सांगता…आता हे आहे प्रतिबंध

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
IMG 20241118 WA0294 1

नाशिक जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघातील जाहीर प्रचाराची सांगता…आता हे आहे प्रतिबंध

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011