इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नांदगाव विधानसभा मतदार संघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेसाठी महिलेला कोंडून ठेवल्याचा व्हिडिओ व्हारयल होत आहे. रविवारी ही सभा नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानात दुपारी २ वाजता होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री आठ वाजता आले. या सभेसाठी आलेल्या महिला कंटाळल्या त्यामुळे त्यांना घरी जायचे होते. पण, नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा गेट कुलूप लावून बंद करण्यात आले. पोलिस त्यांना जाऊन देत नव्हते. त्या घरी लहान मुले असे सांगत होते. पण, त्यांना जाऊ दिले नाही.
हा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत असून विरोधी उमेदवारांनी जोरदार टीका केली आहे. लाडक्या बहिणींना अशी वागणूक दिल्याचे म्हटले आहे. दरम्यान या व्हिडिओ बरोबरच इतरही व्हिडिओ व्हायरल करण्यात आले आहे. ते सध्या चर्चेत आहे. नांदगाव विधानसभा मतदार संघात शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे हे उमेदवार असून ठाकरे गटातर्फे गणेश धात्रक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर अपक्ष म्हणून समीर भुजबळ व डॅा. रोहन बोरसे रिंगणात आहे. ही निवडणूक चौरंगी असून चारही उमेदवारांत मोठी चुरस आहे. त्यामुळे आरोप प्रत्यारोपाच्या फैरी येथे झडत आहे.