मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – स्थानिक पातळीवर असंख्य समस्या आहेत. त्या सुटतच नाहीत. आजवर विकास कामेच झाली नाहीत. त्यामुळे पायाभूत सुविधांबरोबरच विकासासाठी आता आम्हाला समीर भुजबळ हेच आमदार हवेत, अशी एकमुखी मागणी पानेवाडी गणातील नागरिकांनी केली. अपक्ष उमेदवार तथा माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रचार मोहिमेला उदंड प्रतिसाद लाभला.
प्रचार दौऱ्याची सुरुवात धोटाने या गावातून झाली. बाजार समितीचे सभापती दीपक गोगड, अशोक डगळे, दत्तू पवार, अनिल कुनगर, अशोक लहिरे, पंडित गोरे, दिनकर यमगर, राजाभाऊ खेमनार, बाळासाहेब बोरकर, चंद्रभान कदम, आप्पा कुनगर, भगवान सोनवणे, कपिल तेलोरे, योगेश कदम, विनोद शेलार, सुभाष जाधव आदी यात सहभागी झाले. धोटाने, पांझण देव, धनेर, कोंढार, पिंपराळे, वाखारी, नांदूर, दऱ्हेल, बोधेगाव, भारडी, नवसारी या गावांचा दौरा समीर भुजबळ यांनी केला. ठिकठिकाणी उदंड प्रतिसाद लाभल्याने सर्वत्र शिट्टीमय वातावरण झाले होते. यावेळी समीर भुजबळ म्हणाले की, सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वांनी शिट्टी या निशाणी समोरील बटण दाबून मला प्रचंड मतांनी विजयी करावे.
ठिकठिकाणी वाचननाम्याचे वाचन
नांदगाव-मनमाड-मालेगाव मतदारसंघाच्या विकासाचा सर्वंकष आराखडा असलेला वचननामा समीर भुजबळ यांनी जनतेसमोर ठेवला आहे. त्यात पाणी, रस्ते, आरोग्य, पर्यटन अशा विविध क्षेत्रांचा समावेश आहे. हा वचननामा मतदारसंघात चर्चेचा विषय ठरला आहे. पानेवाडी गणातील अनेक गावात ठिकठिकाणी आवर्जून वचननाम्याचे वाचन करण्यात येत होते.
बैलगाडीमधून मिरवणूक
अनेक गावात समीर भुजबळ यांचे जेसीबीतून पुष्पवृष्टी करीत स्वागत करण्यात आले. तर काही गावांमध्ये भुजबळ यांची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आले. तसेच, प्रत्येक गावात त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले.