नांदगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नांदगाव-मनमाड-मालेगाव विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांना मजूर फेडरेशनचे संचालक राजाभाऊ खेमनर यांना पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच, दमबाजी करणाऱ्या सुहास कांदे यांची साथ सोडत असून त्यांच्या धाकदपटशाहीला कुठलीही भीक घालणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, भुजबळ यांचे मतदारसंघातील पारडे दिवसागणिक जड होत आहे. त्यांना विविध संस्था, संघटना, समाज आणि नेत्यांचा पाठिंबा जाहीर होत आहे. त्यामुळे त्यांच्या विजयाची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
साकोरी येथील समीर भुजबळ यांच्या प्रचार सभेत खेमनर सहभागी झाले. त्यावेळी ते म्हणाले की, जेव्हा मी सुहास कांदे बरोबर होतो, तेव्हा ते मला मित्र म्हणायचे. मित्रत्वाच्या गप्पा करायचे. आज मी समीर भुजबळ यांना त्यांच्या विकास कामावरून स्वीकारले आहे. भुजबळ हा विकासाचा पॅटर्न आहे. भुजबळांनी येवल्याचे नंदनवन केले तसे नांदगावचे करतील. म्हणून मी भुजबळ यांन पाठिंबा दिला. तर, कांदे यांनी दमबाजी केली. मात्र, मी त्यांना भीक घालणार नाही. माझी बांधिलकी जनता आणि विकासाशी आहे. कांदेंकडे लाचारांची फौज आहे. आम्ही स्वाभिमानाने भुजबळ यांच्यासोबतच राहू, असे खेमनर यांनी स्पष्ट केले आहे.
खेमनर पुढे म्हणाले की, बिरोबा संस्थानच्या माध्यमातून मी विविध विकास कामे केली आहेत. हे देवाचे संस्थान आहे. मात्र, त्यात भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला जातो. त्यामुळे माझे खुले आव्हान आहे की सीबीआय, सीआयडी, ईडी अशी कुठलीही चौकशी लावा. सत्य समोर आणा. धनगर समाजाचा आत्मा कांदे यांनी दुखावला असल्याची टीकाही खेमनर यांनी केली.
दरम्यान, पंकज भुजबळ यांनी १० वर्षात असंख्य विकास कामे केली. आता समीर भुजबळ यांच्या रुपाने आणखी विकास कार्ये होणार आहेत. त्यामुळे सर्वांनी येत्या २० नोव्हेंबरला मतदान यंत्रावरील शिट्टी या निशाणी समोरील बटण दाबून समीर भुजबळ यांना विजयी करावे, अशी कळकळीची विनंती खेमनर यांनी केली आहे. प्रतारसभेला भाजपचे पंकज शेवाळे, विनोद शेलार, दिनकर यमगर, आप्पा कुनगर, नवनाथ शिल्लक, प्रल्हाद इंगळे, अमोल घाडगे, निवृत्ती चोरघे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
हभप तुकाराम महाराज जेऊरकर यांचे आशिर्वाद
समीर भुजबळ यांनी निमगाव गटातील प्रचार दौऱ्यात जेऊर येथे गुरुवर्य. ह.भ.प. तुकाराम महाराज जेऊरकर यांचे आशिर्वाद घेतले. महाराजांचा त्यांनी शाल, पुष्पहार घालून सत्कार केला. महाराजांनीही भुजबळ यांचे स्वागत करुन सत्कार केला. दोघांमध्ये यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली. तसेच, भुजबळ यांना लाभत असलेल्या प्रतिसादाबद्दल महाराजांनी समाधान व्यक्त केले.