नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नांदगाव विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश धात्रक यांचे वडील माजी आमदार जगन्नाथ धात्रक यांनी नाशिक येथे आज राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी खासदार भास्कर भगरे, नाशिक मध्य विधानसभा मतदार संघाचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार वसंत गिते, माजी महापौर विनायक पाडे, अॅड. विलास लोणारी, हेमंत टकले, गोकुळ पिंगळे, नाना महाले यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थितीत होते.
या भेटीत शरद पवार यांनी नांदगाव मतदार संघात गणेश धात्रक यांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन केले. ते म्हणाले की, गणेश धात्रक हे तरुण उमेदवार असून त्यांच्या पाठीशी महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना भक्कमपणे उभी आहे. त्यांचे वडील जगन्नाथ धात्रक हे माझे जुने सहकारी आहे. त्यांनी दहा वर्षे या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. आज त्यांचा मुलगा गणेश उमेदवारी करत असून त्यांना सर्वांनी विजयी करावे व गद्दारांना धडा शिकवावा.
निवडणुकीच्या प्रचार काळात कमी वेळ असल्यामुळे सर्व ठिकाणी सभा घेणे शक्य नसले तरी मतदारांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करुन विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.