नांदगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – माजी खासदार तथा अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांच्या प्रगत नांदगावच्या व्हिजनने अनेक पक्ष प्रभावित होत आहेत. त्यामुळेच स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, मनमाड शहर तालुका नांदगाव, तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांनी समीर भुजबळ यांना पाठिंबा दिला आहे. विधानसभा निवडणुकीत आम्ही सर्वजण शिट्टी या निशाणीवर आपले बहुमोल मत देऊन समीर भुजबळ यांना विजयी करू असेही त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे दिवसागणिक भुजबळ यांना पाठिंबा वाढत असून त्यांचे मतदारसंघातील पारडे जड झाले आहे.
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष संजय भालेराव, तालुकाध्यक्ष राजाभाऊ गायकवाड, जिल्हा अध्यक्ष दीपक धीवर, जिल्हा महासचिव भगवान भोसले, मा. शहराध्यक्ष प्रमोद जगताप, कैलास पगारे, मानेकर बाबूजी, अल्पसंख्यांक अध्यक्ष तोफिक भाई खान, मुकेश भाई थोरात, निलेश मानेकर, अविनाश चोपडे, भाई पठाणचे अध्यक्ष सचिन संसारे, युवा नेते अनुप गरुड, मिलींद केदारे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे दिलीप नरोडे, पी आर निळे, अमोल बेंडके, श्रावण पवार, राहुल फटांगरे, वैभव बेंडके, विजय महाले, जिल्हा सरचिटणीस कपिल तेलोरे, नांदगाव शहराध्यक्ष सरला अहिरे, हिराबाई पेटारे, संगीता अडकमोल, रंजना अहिरे, अरुण सोनवणे, गोकुळ निकम, मिलिंद निकम यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांना पाठिंबा दिला आहे. नांदगावच्या विकासासाठी भुजबळ यांना विजयी करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे.