मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -ग्रामीण भागातील महिलांना बचत गटाच्या माध्यमातून सक्षमपणे स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत, अशी ठाम ग्वाही डॉ. शेफाली भुजबळ यांनी पानेवाडी गणातील दौऱ्याप्रसंगी केले. अपक्ष उमेदवार मा.खा.समीर भुजबळ यांच्या प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने त्यांनी ग्रामीण भागात गाठीभेटी घेतल्या. शिट्टी निशाणीवर आपले बहुमोल मत देऊन समीर भुजबळ यांना प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले.
पानेवाडी गणातील खादगाव अस्तगाव, नवसारी, बोयेगाव, भारडी, कोंढार या भागातील दौऱ्यावर सकाळपासून डॉ शेफाली भुजबळ या होत्या. नांदगाव तालुका हा दुष्काळी तालुका असून या तालुक्यात उद्योगधंदे नसल्याने या भागातील बहुतांश महिलांना उन्हाळ्यात रिकाम्या हाताने बसावे लागते. याच रिकाम्या हातांना उद्योगाच्या माध्यमातून काम देण्याचा आमचा मानस आहे. बचत गटाची चळवळ अधिक सक्षमपणे राबवून येथील महिलांना उद्योग व्यवसायात आणणे, त्यांना आर्थिक सक्षम बनवण्याचा आमचा उद्देश आहे. येवल्यात पैठणी उद्योगाचे चार माग होते. आता तब्बल साडेपाचशे माग होऊन अनेक रिकाम्या हातांना काम मिळाले आहे. कलाकाराची कलाही त्यातून दिसून आली. येवल्याच्या पैठणीला राज्यभरातच नव्हे तर देशात आणि परदेशातही मागणी वाढत आहे. त्यामुळे विदेशातील चलन आपल्या देशात येऊन येवल्यातील उद्योग, व्यवसायिक आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहे. गावागावात पिण्याच्या पाण्याची असलेली समस्या, लहान मुलांना शाळेची समस्या, शाळांची दुरावस्था, गावात महिलांसाठी सार्वजनिक शौचालय नाही, अशा महिलांना भेडसावणाऱ्या समस्यांचा जाणीवपूर्वक विचार करून आम्ही त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी आपली साथ मा. खासदार समीर भुजबळ यांना देण्याची आवश्यकता आहे. मतदान यंत्रावरील अनुक्रमणिका नंबर नऊ समोरील शिट्टी या निशाणीवर आपले बहुमोल मत देऊन त्यांना विजयी करावे, असे आवाह त्यांनी केले.
अस्तगाव, खादगाव, कोंढार, नांदूर, दरेल, बोयेगाव, धनेर येथील महिला व पुरुष मतदार वर्गाशी गाठीभेटी त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी त्या त्या गावातील ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच, सदस्य, सहकारी संस्थेतील चेअरमन, व्हाइस चेअरमन, संचालक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. त्या त्या गावात महिलांनी डॉ शेफाली भुजबळ यांचे औक्षण करीत शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. याप्रसंगी गट प्रमुख श्री. दत्तू पवार, गण प्रमुख संजय गोटे, श्री. आप्पा कुनगर, दिनकर यमगर (पैलवान), योगिता पाटील, सौ. अपर्णा देशमुख, श्री. रविंद्र यमगर, श्री. नाना हलवर, मनोज काजीकर, ज्ञानेश्वर दुकळे, श्री. बापू सरोदे, सुनील कोल्हे, सोहन हाके, श्री. रुपेश चव्हाण, राकेश निकान, सुभाष वाबळे, सुनील कदम, अशोक वाबळे, दत्तू चव्हाण, विनोद पवार, गणेश कदम, भूषण कदम, सुरेश खांडेकर, वसंत शेरमाळे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.