नांदगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मांजरपाड्याचे पूर पाणी मांडवड परिसरात आणून नांदगाव तालुक्यातील शेती सिंचनाचा प्रश्न निकाली काढणे आणि तालुका सुजलाम, सुफलाम करणे यासाठीच माझी उमेदवारी असल्याचे प्रतिपादन नांदगाव मतदारसंघातील अपक्ष उमेदवार तथा माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले. अनुक्रमांक ९ समोरील शिट्टी निशाणीवर आपले अमूल्य मत देऊन मला विजयी करावे, असे आवाहनही त्यांनी आजच्या दौऱ्या प्रसंगी केले.
मांडवड येथील शहिद जवान संदिप मोहिते या वीर जवानाच्या स्मारकाला समीर भुजबळ यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी आजचा दौरा सुरू केला. यावेळी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. ग्रामस्थांकडून भुजबळ यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. शेती सिंचनाचा प्रश्न मोठा असून तो आपणच सोडवू शकतात, असे मत ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी मा. खा. समीर भुजबळ म्हणाले की, नांदगाव तालुका हा दुष्काळग्रस्त तालुका असून या भागाला न्याय देण्याची भूमिका कायमच भुजबळ कुटुंबाची राहिली आहे. मांजरपाड्याचे पूर पाणी येवला मतदारसंघातून लोहशिंगवे धरणात आणून या भागातील शेती सिंचना खाली येईल यासाठी आराखडा तयार केला जात आहे. त्यामुळे येथील शेती बहरेल याचबरोबर भूगर्भातील पाण्याची पातळी वाढेल. यातूनच पिण्याच्या पाण्याची समस्या मिटेल. त्याचबरोबर अनेक विकासाची कामे करतानाच नांदगाव तालुका भयमुक्त करायचा आहे. विकासाची संकल्पना येथे राबवली जाईल. आपणही आपले बहुमोल मत शिट्टी या निशाणीवर देऊन आम्हालाच विजयी करावे, असे आवाहन मा. खा. समीर भुजबळ यांनी केले.
याप्रसंगी चंद्रसेन आहेर, सुशील आंबेकर, कैलास पाटील, विजय पाटील, दत्तू पवार, राजेंद्र लाठे, प्रसाद सोनवणे, दत्तू निकम, विनोद शेलार, शरद हांडे, अशोक हांडे, खंडू थेटे, गंगाधर थेटे, संजय गुजर, पांडुरंग आहेर, महारू आहेर, बाबुलाल आहेर, आनंदा आहेर, उमाकांत थेटे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
लक्ष्मीनगर येथील प्रचार दौऱ्यावेळी लक्ष्मण उगले, दिगंबर सोनवणे, बाबुराव जाधव, नानासाहेब घाडगे, विश्वास घाडगे, गणेश उगले, सदाशिव उगले, धर्मा सोनवणे, दिनकर सोनवणे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
वडाळी बु. खु. येथील प्रचार दौऱ्यावेळी कैलास नंद, चंद्रभान कोरडे, सिताराम सानप, सुनील कोरडे, रवींद्र कोरडे, दिगंबर पाटील, दत्तू निकम, भगवान पवार, गणेश पवार, सचिन कोरडे, संजय राऊत, आबा बनकर, दत्तू सदगीर, बाजीराव टोणपे, मच्छिंद्र नंद, मनोज धोलप, शाम धोलप, शांताराम अहिरे, युवराज अहिरे, भागवत सदगीर आदी उपस्थित होते. भालूर येथे दिनकर पाटील, दिपक गरूड, शब्बीर शहा, पूंजाराम गलांडे आदी ग्रामस्थ हजर होते. जय पाटील यांनी मा. खा. समीर भुजबळ यांचे स्वागत केले.
सोयगांव येथे वाल्मिक सदगीर, विठ्ठल सदगीर, सावळीराम सदगीर, दत्तू व्हडगर, शंकर सदगीर, ज्ञानेश्वर सदगीर, एकनाथ मोरे, समाधान व्हडगर, सोपान व्हडगर, कैलास सदगीर, नितीन सदगीर, जगन व्हडगर, निवृत्ती व्हडगर, खंडू ठाकरे, आकाश ठाकरे, अनिल माझी, सागर व्हरगड आदी उपस्थित होते.
भौरी येथील प्रचारावेळी डॉ. सागर भिलोरे, विलास गायकवाड, चिंधा भिलोरे, किशोर शिंदे, हरिभाऊ दाभाडे, दत्तू भिलोरे, रावसाहेब भिलोरे, उत्तम बागुल, शांताराम कुमावत, चांगदेव भिलोरे, शिवराम नरोडे हे हजर होते.
खिरडी येथे भिमराव बेंडके, सुदाम बेडके, साहेबराव बेडके, दादाभाऊ ठाकरे, सुभाष सदगीर, गोरख बेंडके, राजाराम चौधरी, राजाराम बापू बेडके, अर्जुन बागुल आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
औक्षण आणि फटाके
प्रत्येक गावात ठिकठिकाणी मा. खा. समीर भुजबळ यांचे महिला-भगिनी यांनी उत्स्फुर्तपणे औक्षण केले. तसेच ग्रामस्थांकडून शाल, श्रीफळ व फटाक्यांची आतषबाजी करीत स्वागत करण्यात आले. त्यामुळे प्रचारदौऱ्यात अतिशय चैतन्यपूर्ण वातावरण होते.