इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
विधानसभा निवडणुकीसाठी नामनिर्देश पत्र छाननी नंतर आता वैध उमेदवरांची यादी फोटोसह प्रसिध्द करण्यात आली आहे. नांदगाव विधानसभा मतदार संघात एकुण ३२ उमेदवार आता रिंगणात असून त्यात शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार नितीन पवार, ठाकरे गटाचे गणेश धात्रक, अपक्ष समीर भुजबळ, अपक्ष उमेदवार डॅा. रोहन बोरसे हे प्रमुख उमेदवार आहे. त्याव्यतिरिक्त इतर राजकीय पक्ष व उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे.