गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नांदगाव मधून माजी खासदार समीर भुजबळ आज भरणार उमेदवारी अर्ज…

by India Darpan
ऑक्टोबर 28, 2024 | 1:06 am
in संमिश्र वार्ता
0
IMG 20241027 WA0077 2 e1730057747754


नांदगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार समीर भुजबळ हे आज सोमवारी सकाळी १० वाजता नांदगाव येथे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भुजबळ समर्थक आणि कार्यकर्ते व मतदारसंघातील नागरिकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देखील भुजबळ समर्थक आणि भयमुक्त नांदगाव – प्रगत नांदगाव समन्वय समितीने केले आहे.

याबाबत भयमुक्त नांदगाव – प्रगत नांदगाव समन्वय समितीचे विजय पाटील, अरुण पाटील, रतन हलवर दीपक गोगड, आणि विनोद शेलार यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, गेल्या ५ वर्षांपासून मतदासंघांत दडपशाहीचे वातावरण आहे. विकासकामांना मोठी खीळ बसली आहे. जी विकासकामे झाली ती अतिशय निकृष्ट दर्जाची झाली आहेत त्यामुळे नांदगाव भयमुक्त आणि प्रगतशील करण्यासाठी समीर भुजबळ उमेदवारी करत आहेत. ते कोणत्याही पक्षाचे नसून जनतेचे उमेदवार आहेत

समीर भुजबळ हे नाशिकचे खासदार असताना त्यांनी अनेक विकास कामे करून नाशिकचा कायापायलट केला होता. अनेक पथदर्शी प्रकल्प त्यांच्या कार्यकाळात सुरू झाले आहेत. त्यामुळे मतदारसंघातील जनता त्यांच्या पूर्ण पाठीशी आहे. त्यामुळे ते नांदगाव विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करतील आणि बहुमताने निवडून येतील असा आम्हाला विश्वास आहे.

समीर भुजबळ यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी नांदगाव शहरात सकाळी १० वाजता जैन धर्मशाळा मालेगाव रोड येथून शिवाजी चौक, कालिका चौक, महात्मा फुले चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, जुनी पालिका, अहिल्यादेवी होळकर चौक मार्गे पुन्हा जैन धर्म शाळेजवळ येऊन इथे जाहीर सभा पार पडणार आहे. त्यानंतर काही प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील.

नांदगाव तालुक्यातील कार्यकर्ते व नागरिकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भयमुक्त नांदगाव – प्रगत नांदगांव समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

विधानसभा निवडणुकांसाठी राज्यात ९१५ शॅडो मतदान केंद्र

Next Post

बबनराव घोलप यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश….

Next Post
Untitled 96

बबनराव घोलप यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश….

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आर्थिक बोलणी करताना सावध राहावे, जाणून घ्या, शुक्रवार, २० जूनचे राशिभविष्य

जून 19, 2025
Untitled 62

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…एकनाथ शिंदे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 61

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…उध्दव ठाकरे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 60

ठाकरे गटाला वर्धापन दिनीच मोठा धक्का….मुंबईतील हे माजी नगरसेवक,पदाधिकारी शिंदे गटात

जून 19, 2025
WhatsApp Image 2025 06 19 at 4.03.25 PM 1068x1424 1 e1750339743397

नागपूर येथील तब्बल ४२६ झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना त्यांचे हक्काचे घर

जून 19, 2025
Untitled 59

नाशिकमध्ये गोदीवरी नदीला पूर, नदीपात्रात कार अडकली, भांडी बाजार परिसरात दुकानात पाणी

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011