नांदगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नांदगाव – मनमाड रस्त्यावरील हिरेनगर शिवारात दोन कारची समोरासमोर धडक झाल्याने घडलेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर चार जण गंभीर जखमी झाले आहे.
सकाळी झालेल्या या अपघातातील मृत व जखमी हे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा व नाशिक जिल्ह्यातील मोहाडी या गावातील आहे. या अपघातात गाड्यांचेही मोठे नुकसान झाले. अपघातानंतर तातडीने पोलीस व आमदार सुहास कांदे यांच्या कार्यकर्त्यांनी जखमींना रुग्णवाहिकेद्वारे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. येथे प्राथमिक उपचार घेतल्यानंतर त्यांना मालेगाव येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे..
या अपघातात शिवाजी भास्कर देशमुख (वय ६०) रा.मोहाडी, नाशिक, उषा नारायण महाजन, (वय ६०) पाचोरा, जि.जळगाव यांचा मृत्यू झाला. तर आशा शिवाजी देशमुख, विकास शिवाजी देशमुख, गयाबाई आदिक देशमुख, रा. मोहाडी, जि.नाशिक व नारायण सुकदेव महाजन, पाचोरा हे जखमी झाले आहे.