नांदगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नदी जोड प्रकल्पात नाशिकच्या नांदगाव तालुक्याचा समावेश करावा या मागणी साठी राजकीय जोडे बाहेर काढून एकत्र लढा देण्याचा निर्धार नार-पार जलहक्क समितीच्या सर्वपक्षीय बैठकीत एकमुखाने घेण्यात आला.
शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख गणेश धात्रक यांच्या अध्यक्षतेखाली व खासदार भास्कर भगरे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत मुंबई उच्च न्यायलयात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय घेण्यात येऊन पुढील दोलनाची दिशा ठरविण्यात आली. या बैठकीमध्ये तालुक्यातील सर्व पक्षीय नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.