अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नांदगाव पोलीस दलाकडून आज युवकांसाठी १६०० मिटरची ‘ मॅरेथॉन ‘ स्पर्धा घेण्यात आली. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत हजारो युवकांनी सहभाग नोंदविला.पोलीस निरिक्षक रामेश्वर गाडे, कृषिवलचे ज्ञानेश्वर बोगीर यांनी स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत स्पर्धेतील विजयी झालेल्या युवकांचा गौरव केला..