अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील गोंडेगाव येथील शेतकरी राजेंद्र गवळी यांच्या शेतातील विहिरीत पाण्याच्या शोधात आलेला कोल्हा विहिरीत पडलयाची घटना घडली. शेतात फेरफटाक मारण्यासाठी असतांना राजेंद्र गवळी यांना कोल्हा विहिरीत पडल्याचे समजले. त्यांनी तात्काळ वनविभागाला घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच मनमाड व नांदगाव वनपरिक्षेत्राचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने विहीरीत जाळी टाकुन प्रसंगावधान राखत मोठ्या कसरतीने कोल्हाला सुरक्षित बाहेर काढले. त्याला नैसर्गिक अधिवासात सोडताच कोल्ह्याने धुम ठोकली.