अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
शहरातील कांदा व्यापारी सचीन फोफलिया यांच्या येवला रोड येथील कांदयाच्या वखारीत कांदे गोणी भरायचे काम चालू असतानां तेथे असलेल्या प्लॅस्टीक कागदा खाली साप दिसला. कामगाराच्या हेलक्षात येताच तेथील मुकादम अप्णा काळे याने सर्पमित्र विजय बडोदे यास संपर्क करून बोलावले. बडोदे यांनी कागदा खाली ५ फुट लांबीचा कोब्रा जातीचा विषारी साप मोठया शिताफीने पकडून बरणीत बंद केला. या कांदा वखारीत महीला, लहान मुले, माणसे असे शेकडो कामगार होते.
सद्या पावसाचे दिवस सुरू असल्याने जमीनीत पाणी गेल्याने सदर साप निघत असल्याचे सर्पमित्र विजय बडोदे यांनी सांगितले.