अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
नांदगाव-मनमाड विधानसभेचे शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्या संकल्पनेतून आमदार आपल्या दारी या उपक्रम मोहिमेला आज पासून मनमाड मध्ये सुरुवात झाली. नांदगावचे तहसिलदार मोरे यांच्या हस्ते फीत कापून या मोहमेचा शुभारंभ करण्यात आला. येत्या काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होऊ घातल्या आहेत. मनमाड शहरातील प्रत्येक भागातील नागरीकांना नगर परिषद, महावितरण, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य या विषयीच्या तक्रारींचे निराकारण जागीच व्हावे यासाठी आणि त्या तातडीने मार्गी लागाव्या या उद्देशाने आमदार आपल्या दारी ही मोहीम सुरु करण्यात आली. शहरातील प्रत्येक भागात तालूक्यातील शासकीय अधिका-यांच्या उपस्थितीत हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याच आमदार सुहास कांदे यांनी स्पष्ट केले. या मोहिमेला पहिल्याच वेळी नागरीकांचा चांगला प्रतिसाद पहावयास मिळाला.