अजय सोनवणे, मनमाड
नांदगाव विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक रेशन कार्ड पासून वंचित असलेल्या कुटुंबास घरपोच रेशन कार्ड उपलब्ध करून देण्याची मोहीम गेल्या दोन वर्षांपासून चालू असून आज नांदगाव तालुक्यातील हिरेनगर येथील आदिवासी कुटुंबांना रेशन कार्ड उपलब्ध करून देण्यात आले. हिरेनगर येथील जवळपास साठ आदिवासी कुटुंबात जवळ आजपर्यंत रेशन कार्ड नव्हते, आज हिरेनगर येथे लाभार्थी कुटुंबीयांना रेशन कार्ड वाटप करण्यात आले. लाभार्थ्यांनी कृतज्ञता व्यक्त करत आमदार सुहास अण्णा कांदे यांचे आभार मानले.