अजय सोनवणे, मनमाड
नांदगाव शहरातील मल्हारवाडी जवळील दहेगाव फाटा जवळ कुत्र्याच्या हल्ल्यात एका हरणाच्या पडासाचा मृत्यू झाला. शहरातील मल्हारवाडी जवळील डोंगर परिसरात हरणांचे कळप पाण्याच्या शोधात मानवी वस्ती कडे पाणी पिण्यासाठी येत असतात.. हरणांच्या कळपातील एका पाडसा वर भटक्या कुत्र्यांनी हल्ला चढवला त्यात गंभीर जखमी झालेल्या पाडसाची स्थानिक नागरिकांनी व सर्पमित्र विजय बडोदे यांनी त्याची सुटका केली . मात्र त्या पाडसाचा मृत्यू झाला. सर्पमित्र बडोदे यांनी वनविभागाला ताबडतोब दुरध्वनीवरुन या घटनेची माहिती दिली. यावेळी वनविभाग कर्मचारी संतोष दराडे यांच्या ताब्यात पाडसाला देण्यात आले.